KL Rahul Vice-Captain 
क्रीडा

KL Rahul Vice-Captain : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाने बदलला आपला उपकर्णधार!

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. तो बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला. बोर्डाने केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करता आले नाही. यानंतर शनिवारी आयसीसीने जाहीर केले की, पांड्या यापुढे वर्ल्ड कप खेळणार नाही. पांड्या बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. 2023 च्या वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला अजूनही दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे.

केएल राहुलकडेही संघाचे नेतृत्व करण्याचा बराच अनुभव आहे. राहुलने आतापर्यंत 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी संघाने 6 जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. याशिवाय केएल राहुलही या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 97 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. तो सामना संघाला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी सकाळी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. आतापर्यंत केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये भाग घेत होता, आता उपकर्णधार म्हणून, गोलंदाज आणि फलंदाजीसह सर्व संघ मीटिंगचा भाग असले. संघ व्यवस्थापनही राहुलसोबत प्रत्येक विषयावर चर्चा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT