KL Rahul

 
Sakal
क्रीडा

KL Rahul retirement talks: केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार? ; जाणून घ्या, त्याने स्वतःच याबद्दल नेमकं काय सांगितलय

KL Rahul retirement rumours :कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात जरी खेळत असला तरी टी-20 सामन्यांमध्ये त्याचे स्थान घसरलेले आहे.

Mayur Ratnaparkhe

Is KL Rahul Retiring From Cricket? : भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुल हा सध्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना आपण पाहत आहेत. मात्र,  टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे स्थान घसरले आहे. शिवाय, आता अशाही चर्चा सुरू आहेत, की केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.

याबाबत  केएल राहुलने स्वतः परिस्थिती स्पष्ट केली आहे. खरंतर त्याने त्याबद्दल विचारही केला होता, परंतु राहुलने आता सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलंय. सध्या  केएल राहुल कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सलामीवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असला तरी, त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका देखील पार पाडावी लागत आहे.

याचबरोबर, तो विकेटकीपरची जबाबदारी देखील खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. दरम्यान, राहुलने एका मुलाखतीत सांगितले आहे की, त्याने काही काळापूर्वी निवृत्तीचा विचार केला होता, परंतु नंतर त्याला जाणवले की त्याच्याकडे निवृत्ती घेण्यासाठी काही वेळ शिल्लक आहे आणि तो खेळत आहे.

केएल राहुलने स्पष्टपणे सांगितले की, निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण होणार नाही, कारण जगात इतरही अनेक गोष्टी आहेत. राहुल म्हणाला की जर तुम्ही प्रामाणिक असाल तर योग्य वेळ आल्यावर याबाबतही योग्य निर्णय होईल. ही अशी गोष्ट आहे जी जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही. पण त्याला वाटते की त्याची निवृत्ती अजून काही काळ दूर आहे.

१९९२ मध्ये जन्मलेला केएल राहुल सध्या ३३ वर्षांचा आहे. तो या वर्षी एप्रिलमध्ये त्याचा वाढदिवस साजरा करेल. राहुलने भारतासाठी ६७ कसोटी सामने खेळले आहेत आणि या फॉरमॅटमध्ये ४ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने ११ शतके आणि २० अर्धशतके केली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ सामने खेळले आहेत आणि ३,३६० धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याचे आठ शतके आणि २० अर्धशतके आहेत. तो दोन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळत आहे.

याशिवाय राहुल सध्या टी-20 संघाबाहेर आहे, मात्र त्याने ७२ सामन्यांमध्ये २२६५ धावा केलेल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने २०२२ मध्ये शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे : १० दिवसांपूर्वी घर बदलले, रात्री लेकाचा फोटो स्टेट्सला ठेवला अन् सकाळी केली हत्या; दोघांना मारून जीवन संपवण्याचा होता विचार

Budget 2026 : बजेट 1 फेब्रुवारीलाच का सादर केल जात? पूर्वी वेगळी तारीख होती, ब्रिटिश काळातील प्रथा मोदी सरकारने का बदलली?

Singhabad Railway Station: रेल्वे स्टेशन आहे, पण प्रवास नाही! जाणून घ्या भारतातील 'या' अनोख्या स्टेशनबद्दल

Pankaja Munde: ''तुमची दारु फॅक्ट्री आधी बंद करा'', कारखान्याचं नाव घेत करुणा मुंडेंची पंकजांवर टीका

Latest Marathi News Live Update : पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, मंत्री गिरीश महाजनांचा निषेध

SCROLL FOR NEXT