kl rahul Man Of The Match  
क्रीडा

IND vs SA : 'मी हैरान झालो...' Man Of The Match नंतर केएल राहुलचे धक्कादायक विधान

केएल राहुलसह मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd T-20 KL Rahul : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा भारताने आपल्या भूमीवर टी-20 मालिकेत पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

उपकर्णधार केएल राहुलसह मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट स्ट्राईक रेटने अर्धशतके झळकावली. सामन्यानंतर केएल राहुलला त्याच्या 28 चेंडूत 57 धावा केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या केएल राहुल म्हणाला की, 'मी हैरान झालो की मला सामनावीराचा पुरस्कार मिळत आहे, सूर्याला तो मिळायला हवा होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने या सामन्यात 5 षटकारच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी केली. कोहलीमुळे तो धावबाद झाला, अन्यथा डाव मोठा होऊ शकला असता.

भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. यादरम्यान विराट कोहलीने नाबाद 49 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरने शतक आणि क्विंटन डी कॉकने अर्धशतक झळकावले, पण ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 221 धावा करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT