Asia Cup 2023 
क्रीडा

Asia Cup 2023 : 'आशा करतो की दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यापर्यंत राहुल फिट...' आगरकरांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 India squad : आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सोमवारी दिल्लीत 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. याशिवाय संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे.

बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. अशा स्थितीत भारताची मधली फळी नक्कीच मजबूत झाली आहे, पण राहुलच्या पुनरागमनाच्या आनंदापेक्षाही अजित आगरकर यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

राहुल सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. अलीकडे तो सराव सामने खेळताना दिसला होता. अशा परिस्थितीत राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचा अंदाज लोक बांधत होते. याच कारणामुळे त्याची आशिया कप संघातही निवड झाली होती. मात्र, आता एक नवीन माहिती समोर येत आहे की, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसून त्याला पुन्हा दुखापत झाली आहे.

संघ निवडीदरम्यान आगरकर म्हणाला की, राहुलची नवीन समस्या त्याच्या जुन्या दुखापतीशी संबंधित नाही. तो किरकोळ दुखापत आहे. त्यामुळेच संजूला संघात घेण्यात आले आहे. राहुल तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे. आशिया कपच्या सुरुवातीला तो पूर्णपणे तंदुरुस्त नसला तरी दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे. राहुल काही नव्या समस्येशी झुंजत असून ते पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे या विधानावरून स्पष्ट झाले. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT