KL Rahul vs Temba Bavuma Sakal
क्रीडा

VIDEO : KL राहुलचा रॉकेट थ्रो; बवुमाला दाखवला तंबूचा रस्ता

सुशांत जाधव

South Africa vs India, 3rd ODI : केपटाऊनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ऑल आउट करुन दाखवलं. गोलंदाजीतील बदल टीम इंडियाच्या फायद्याचा ठरला. याशिवाय फिल्डिंगमध्येही सर्वोच्च नजराणा पाहायला मिळाला. कर्णधार लोकेश राहुलनं दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला डायरेक्ट हीटवर रन आउट केले. ही भारतासाठी मोठी विकेट होती. दुसऱ्या वनडेत बवुमानं शतकी खेळी साकारून टीम इंडियाला पराभूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला लवकर बाद करण्यात टीम इंडियाला यश आले.

तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत लोकेश राहुलनं (KL Rahul) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. दीपक चाहरनं (Deepak Chahar) मलानला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर 34 धावा असताना लोकेश राहुलनं अप्रतिम थ्रोवर टेम्बा बवुमाला (Temba Bavuma) तंबूचा रस्ता दाखवला. बवुमानं 12 चेंडूचा सामना करताना 8 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सातव्या षटकात दीपक चाहर गोलंदाजी करत होता. चाहरचा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं टोलावल्यानंतर बवुमाने धाव घेण्याचा प्रयत्न केला. लोकेश राहुलनं क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवत डायरेक्ट थ्रो करत बवुमाचा खेळ खल्लास केला. सोशल मीडियावर लोकेश राहुलच्या फिल्डिंगचे कौतुक होताना दिसत आहे.

भारतीय संघाने सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघाला धक्के दिले. पण त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि रस्सी व्हॅन डर दुसेन जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. क्विंटन डिकॉकनं शतकी खेळी केली. तर दुसऱ्या बाजुला दुसेनं याने अर्धशतकी खेळी करत संघासाठी उपयुक्त धावा केल्या.

या दोघांशिवाय डेविड मिलरने 39 धावांचे योगदान दिले. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटचे षटक पूर्ण होण्याआधीच ऑल आउट झाला. बवुमाच्या विकेटशिवाय श्रेयस अय्यर पंत जोडीनं फेलुकवायोच्या रुपात रन आउच्या रुपात एक विकेट घेतली. भारतीय संघाने रन आउटच्या रुपात दोन गड्यांना स्वस्तात माघारी धाडले. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑल आउट केले आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत मालिका खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Chinnaswamy Stadium Update: 'आयपीएल' आधीच ‘RCB’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!, चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल झाला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : "कमिशनखोरी अन् उन्माद खपवून घेणार नाही"; फडणवीसांचा पुण्याच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना कडक इशारा!

Horoscope : माघ महिना सुरू होताच 5 राशींचे भाग्य बदलणार; होणार धनलाभ, खूप वर्षांपासूनची इच्छा होईल पूर्ण, नोकरी-धंद्यात मिळेल मोठे यश

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT