World Athletics Championship 2023 sakal
क्रीडा

World Athletics Championship 2023 : मिश्र रिले संघाची संधी हुकली; महिला रिले संघही पात्रतेपासून दूर

जागतिक ॲथलेटिक्स; केनियाचा संघ १६ व्या स्थानावर असून त्यांची सर्वोत्तम कामगिरी ३ मिनीटे १४.६४ सेकंद आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : येत्या १९ ऑगस्टपासून बुडापेस्ट (हंगेरी) येथे जागतिक स्पर्धा होत असून भारताचा लांब उडीतील आशियाई रौप्यपदक विजेता मुरली श्रीशंकर प्रशिक्षक असलेल्या वडिलांसोबत दाखल झाला असला तरी मिश्र रिले संघातील धावपटूंना हे भाग्य लाभणार नाही. कारण पात्रता गाठण्याची अंतिम तारीख ३१ होती सध्या भारतीय संघ १७ वा असून प्रथम १६ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

केनियाचा संघ १६ व्या स्थानावर असून त्यांची सर्वोत्तम कामगिरी ३ मिनीटे १४.६४ सेकंद आहे. भारताची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी ३ मिनीटे १४.७० सेकंद असून प्रथम १६ संघात येण्यासाठी भारतीय संघाला केनिया संघापेक्षा सर्वोत्तम वेळ नोंदविण्याची गरज होती.

त्यासाठी भारतीय संघाने कोलंबो येथे श्रीलंका राष्ट्रीय स्पर्धेतही भाग घेतला. मात्र, ऐश्वर्या मिश्रा, हिमांशी मलिक, महम्मद अनस व अमोल जेकब या चौकडीला फक्त ३ मिनीट १७.३४ सेकंद अशीच वेळ नोंदवू शकले.

आता प्रथम १६ संघातील एखाद्या संघाने माघार घेतली तरच भारतीय संघाला संधी मिळू शकते, असे राष्ट्रीय शिबिरात असलेल्या एका प्रशिक्षकाने सांगितले. बुधवारी जागतिक ॲथलेटिक्स संघटना येत्या २ तारखेला पात्र ठरलेल्या खेळाडू व संघाची नावे संबंधित राष्ट्रीय संघटनांना पाठवेल.

त्यानंतर किती खेळाडू नेमके पात्र ठरले हे स्पष्ट होईल. महिलांचा ४-४०० मीटर रिले संघाला तर अजिबात संधी नाही. कारण हा संघ सध्या २३ व्या स्थानावर आहे. पुरुष संघ १५ व्या स्थानावर असल्याने जवळ-जवळ पात्र ठरला आहे.

डायमंड लीग विजेता नीरज चोप्रा, मुरली श्रीशंकर, अविनाश साबळे हे भारताचे हुकमी एक्के राहणार असून जेस्विन अल्ड्रिन, प्रवीण चित्रावेल, अब्दुला अबुबकर, ज्योती यराजी यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा राहतील. किशन कुमार (८०० मीटर), अजयकुमार सरोज (१५०० मीटर), सर्वेश कुशारे (उंच उडी), राम बाबू (३५ किलोमीटर चालणे), संतोष कुमार (४०० हर्डल्स) हे सुद्धा जागतिक रँकिंगनुसार जवळ-जवळ पात्र ठरले आहेत.

मुरली श्रीशंकर दाखल

जागतिक स्पर्धा सुरू होण्यास १९ दिवसांचा कालावधी असला तर भारताचा मुरली श्रीशंकर बुडापेस्टमध्ये दाखल झाला आहे. त्याच्यासोबत त्याचे प्रशिक्षक असलेले वडीलसुद्धा आहेत. ‘प्रथम दोन आंतरराष्ट्रीय ‘डेलिगेट'' बुडापेस्टमध्ये दाखल झाल्याचा आम्हाला आनंद आहे. हे दोघेही भारतातून येथे दाखल झाले आहेत'' अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी बलाझ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT