kolhapur swimmer riya patil won gold with new record sakal
क्रीडा

खरी फाईटर! शारीरिक हालचालींवर मर्यादा तरी कोल्हापूरच्या रियाने मोडला विक्रम अन् पटकावलं सुवर्ण

सकाळ ऑनलाईन टीम

Kolhapur Swimmer Riya Patil News : नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (CPSFI) स्पर्धेत कोल्हापूरची जलतरणपटू रिया पाटीलने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत तिने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक जिंकले आहेत.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत तिने ही विक्रमी कामगिरी केली. महाराष्ट्राने या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून चॅम्पियन ट्रॉफीचा खिताब पटकावला. ही स्पर्धा केंद्रीय क्रीडा सोबत युवक मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आली होती सोबत 10 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

या आधी रिया पाटीलने गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनिटे 57 सेकंदाची तर 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 12 सेकंदाची अप्रतिम कामगिरी नोंदवली होती.

पण रिया पाटीलने आता स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. तिने 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनीट 47 सेकंद तर 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 5 सेकंदाचा नवा विक्रम केला आहे. रियाची ही कामगिरी सर्वच मुलींसाठी आदर्श अशीच आहे.

सेरेब्रल पाल्सी हा विकार शारीरिक हालचालींशी संबंधित असून यात स्नायूची शक्ती, त्याचे नियमन आणि स्नायूंच्या अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा आहे. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला झालेल्या हानीमुळे होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयावर भटक्या-विमुक्त जमाती संघटना संतप्त, उपोषणाचा इशारा, तारीखही सांगितली!

"वन नाईट स्टँड करणार नाही! इंटिमेंट सीन देताना घाबरली अभिनेत्री जरीन खान म्हणाली...'कुणाशीही इंटिमेट होण्यासाठी...'

Arun Gawli: दाऊदने केलेला 'तो' खून अन् अरुण गवळी बनला अंडरवर्ल्ड डॉन; मुंबईत दगडी चाळीचं साम्राज्य कसं वाढलं?

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस विभागाच्या विशेष कारवाईत ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था, जड वाहनांना शहरात प्रवेशास बंदी

SCROLL FOR NEXT