Swapnil kusale sakal
क्रीडा

चांगलं झालं की...! स्वप्नीलच्या पदकानंतर आजीची भारी प्रतिक्रिया, आई-वडिल यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

Swapnil kusale Paris Olympic 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Live Update : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने ( Swapnil Kusale) याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले. मनु भाकर हिच्यानंतर पॅरिसमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदक जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली... १९५२ नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते.

राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेला नेमबाज स्वप्नीलकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वडिलांना पदकाची आशा होतीच आणि त्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. स्वप्नीलने ४५१.४ गुणांसह कांस्यपदक पटकावले. १९५२ मध्या खाशाबा यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते आणि त्यानंर ७२ वर्षानंतर महाराष्ट्रात आज स्वप्नीलने ऑलिम्पिक पदक आणले.

स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर वडील सुरेश कुसाळे म्हणाले, मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या १२-१३ वर्षांची तपश्चर्या कामी आली. त्याने भारताचा तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे. आई अनिता कुसाळे यांनीही खूप आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले होते. स्वप्नीलच्या आजच्या सामन्यापूर्वी आई-वडिलांनी ग्रामदेवतेला अभिषेक केला होता.

स्वप्नीलच्या आजीची प्रतिक्रिया यावेळी बोलकी होती. नातवाने पदक जिंकल्यानंतर आजीने खास कोल्हापूर स्टाईल नातवाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, करून दावलं.. चागलं झालं की... आमचा आशीर्वाद कायमचा आहे... तो समोर आला की त्याचा मुका घेणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

SCROLL FOR NEXT