KSA Football Competition Practice Club Wins  
क्रीडा

कोल्हापूर : प्रॅक्‍टीस क्लबकडून संयुक्त जुना बुधवारचा धुव्वा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत आज प्रॅक्‍टीस क्‍लबने (अ) संयुक्त जुना बुधवार तालीम मंडळाचा 5-1 असा धुव्वा उडवून तीन गुणांची कमाई केली. दरम्यान दुपारच्या सत्रातील पाटाकडील तालीम मंडळ (ब) विरूद्ध बीजीएम स्पोर्टसमधील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. शाहू स्टेडीयमवर स्पर्धा सुरू आहे.

सायंकाळी प्रॅक्‍टीस विरूद्ध जुना बुधवार पेठ संघातील सामना पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिला. प्रॅक्‍टीससारख्या तुल्यबळ संघाला जुना बुधवारने पहिल्या सत्रात चांगली लढत दिली. उत्तरार्धात मात्र प्रॅक्‍टीसने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. सागर चिले याने 48 व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल नोंदविला. ओंकार मोरे यांने दुसरा, तर सी. जी. ऐकेय याने तिसऱ्या गोलची नोंद केली. 85 व्या मिनिटाला कैलास पाटील याने चौथ्या गोलची नोंद केली. जुना बुधवारकडून झालेल्या आक्रमणात सुशील सावंत याने चकवा देत एका गोलची परतफेड केली. सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना सी. जी. अेकेय याने प्रॅक्‍टीसच्या पाचव्या गोलची नोंद केली. प्रॅक्‍टीसकडून राहूल पाटील, नीलेश सावेकर, कैलास पाटील, इंद्रजित चौगुले, तर जुना बुधवारकडून रोहन कांबळे, सुमित घाटगे, टीच मॉड, मयूर शेलार यांनी चांगला खेळ केला. 

सामना बरोबरीत

दुपारच्या सत्रातील सामन्यांमध्ये पाटाकडील तालीम मंडळ "ब' विरुद्ध बीजीएम स्पोर्ट यांच्यात लढत झाली. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिला. नवख्या बी.जी.एम. स्पोर्टस्‌ने पाटाकडील संघाला झुंजवले. आक्रमक चढाया आणि नियोजनबद्ध चालीमुळे पाटाकडीलच्या संघाला गोल साधता आले नाहीत. उत्तरार्धात पाटाकडीलच्या वैभव देसाई याने सामान्याच्या 66 व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर बीजीएमने अधिक आक्रमक खेळ केला. मात्र, सामन्याची वेळ संपेपपर्यंत पाटाकडीलच्या उत्कृष्ट बचावामुळे गोल साधता आला नाही. सामन्याच्या अधिकच्या वेळेत बीजीएमकडून केवल कांबळे याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यागोल मुळे सामना अखेरच्या क्षणी बरोबरीत राहिला. बीजीएमने मोक्‍याच्या क्षणी साधलेल्या गोलमुळे पीटीएम ब संघाच्या तोंडाचा घास हिसकावला गेला. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघाना 1-1 गुण बहाल करण्यात आले. 

मंगळवारचे सामने 

  • संध्यामठ विरूद्ध ऋणमुक्तेश्‍वर : दुपारी 2 वाजता 
  • शिवाजी तरूण मंडळ विरूद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ : दुपारी 4 वाजता 

संबंधीत बातम्या -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

SCROLL FOR NEXT