Kuldeep Sen Ruled Out BAN v IND ODI sakal
क्रीडा

Kuldeep Sen : लागलं ग्रहण! केवळ एकच सामना खेळून कुलदीप सेन संघातून बाहेर

Kiran Mahanavar

Kuldeep Sen Ruled Out BAN v IND ODI : बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला. भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल करण्यात आला होता. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन या सामन्यात विश्रांती दिली. त्याला दुखापत झाल्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्याच्या जागी दुसरा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

गोलंदाज कुलदीप सेन हा मूळचा मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील असून त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताने सामना गमावला असला तरी कुलदीप सेनने चांगली कामगिरी करत एका षटकात दोन बळी घेतले. मात्र आता त्याला ग्रहण लागलं आहे. कारण केवळ एकच सामना खेळून कुलदीप सेन संघातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'पहिल्या वनडेनंतर कुलदीप सेनला पाठीचा त्रास झाला होता आणि वैद्यकीय पथकाने त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन केल्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

कुलदीप सेनने 2018 मध्ये पहिला रणजी सामना खेळला होता. चार वर्षांच्या मेहनतीनंतर 2022 मध्ये त्याला 20 लाख रुपयांना राजस्थान रॉयल्सने विकत घेतले. त्या मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 7 सामने खेळले आणि 4 विकेट घेतल्या. याआधीही कुलदीप सेनची भारतीय संघात निवड झाली होती. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याचे नाव पुढे आले. मात्र, नंतर बीसीसीआयने संघ बदलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT