Kuldeep Yadav Hat-Trick Against New Zealand A in 2nd unofficial ODI
Kuldeep Yadav Hat-Trick Against New Zealand A in 2nd unofficial ODI esakal
क्रीडा

Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Kuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय 'अ' संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याने न्यूझीलंड 'अ' विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हॅट्ट्रिक केली. कुलदीपच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा संघ 219 धावात गारद झाला. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कुलदीपने वॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत हॅट्ट्रिक केली.

न्यूझीलंड अ च्या डावातील 47 व्या षटकात कुलदीपने चौथ्या चेंडूवर एक विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर वॉकरला संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने जेकबला पायचीत बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केले. या सामन्यात कुलदीपने 10 षटकात 51 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपबरोबरच ऋषी धवनने 2 तर राहुल चाहरने 2 विकेट्स घेतल्या. उमारन मलिक आणि राज बावाने प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.

कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली आहे. कुलदीप यादवने वनडेमध्ये दोनवेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कोलकात्यातील वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानंतर त्याने 2019 मध्ये देखील वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. कुलदीप यादवने अंडर 19 पासूनच हॅट्ट्रिक घेण्यास सुरूवात केली होती. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये देखील हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT