एलबीएचएम जलद मानांकन बुद्धिबळ स्पर्धा; पश्चिम बंगालच्या निलाश साहाला जेतेपदाचा मान Sakal
क्रीडा

एलबीएचएम जलद मानांकन बुद्धिबळ स्पर्धा; पश्चिम बंगालच्या निलाश साहाला जेतेपदाचा मान

निलाश साहा आणि अरण्यक घोषचे प्रत्येकी साडेआठ गुण झाल्याने टायब्रेकमध्ये निलाश सहा विजेता ठरला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ (पीडीसीसी) संघटना व आर्यन एंटरप्रायझेस आयोजित एलबीएचएम जलद आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत पश्चिम बंगालच्या निलाश साहाने साडेआठ गुणांसह विजेतेपद पटकावले.

उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावर अरण्यक घोष आणि स्नेहल भोसले ही लढत बरोबरीत सुटली तर दुसऱ्या पटावर निलाश साहाने आदित्य सावळकरला पराभूत केले. निलाश साहा आणि अरण्यक घोषचे प्रत्येकी साडेआठ गुण झाल्याने टायब्रेकमध्ये निलाश सहा विजेता ठरला.

रत्नाकरन के., काशीश जैन, दीप्तयान घोष, अखिलेश नागरे व मंदार लाडने प्रत्येकी आठ गुणासह तीन ते सात क्रमांकात तर अभिषेक केळकर, सुयोग वाघ व ऋत्विज परबने प्रत्येकी साडेसात गुणांसह आठ ते दहा क्रमांकात यश मिळविले.

या स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी महिला ग्रँडमास्टर मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर, प्रकाश कुंटे, अशोक तेली, स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र कोंडे, संचालक नागनाथ हलकुडे, वंदना हलकुडे, प्रमुख पंच वसंथ बीएच हे उपस्थित होते.

नवव्या फेरीचे निकाल

स्नेहल भोसले (८ गुण, महाराष्ट्र) बरोबरी विरुद्ध अरण्यक घोष (८.५ गुण, पश्चिम बंगाल), निलाश साहा (८.५, पश्चिम बंगाल) वि.वि. आदित्य सावळकर (७, महाराष्ट्र), ग्यान साई संतोष (७, आंध्र प्रदेश) पराभूत विरुद्ध सप्तर्षीरॉय चौधरी (८, पश्चिम बंगाल), सुयोग वाघ (८, महाराष्ट्र) वि.वि. श्रीहरी के. आर. (७, तमिळनाडू),

कार्तिकेयन पी. (८.५, तमिळनाडू) वि.वि. मयूख मजुमदार (७, पश्चिम बंगाल), अभिषेक केळकर (८, महाराष्ट्र) वि. वि. मन्ना चिरंजित (७, पश्चिम बंगाल), लक्ष्मी चरण नायडू (७, केरळ] पराभूत विरुद्ध अरविंद अय्यर (८, महाराष्ट्र), श्रीजोन साहा (७.५, पश्चिम बंगाल) बरोबरी विरुद्ध प्रथमेश शेरला (७.५, महाराष्ट्र), दीप्तायन घोष (७.५, पश्चिम बंगाल) पुढे चाल विरुद्ध हर्षित रंजन साहू (६.५, महाराष्ट्र), नितीन एस. (७.५, तमिळनाडू) वि.वि. मधेशकुमार एस. (६.५, तमिळनाडू).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारतीय संघाची फायनलमध्ये धडक! वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे फ्लॉप, पण उपकर्णधाराने उपांत्य सामन्यात मिळवून दिला विजय

जे बात! सख्खी बहीण होणार शत्रू पण सासू घेणार धाकट्या सुनेची बाजू; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये पुढे काय घडणार?

PMC Election : प्रचारासाठी मैदान, चौक वापरायचा असेल तर पैसे मोजा; पुणे महापालिकेचे निवडणूक शुल्क जाहीर!

Thane Politics: कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसची ताकद कायम, पोटेंच्या आरोपांना रत्नप्रभा म्हात्रेंचा पलटवार

IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT