Leander Paes Guilty in Domestic Violence Case  esakal
क्रीडा

लिअँडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी; रियासोबत होता लिव्ह-इनमध्ये

सकाळ डिजिटल टीम

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिअँडर पेसला (Leander Paes) वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने घरगुती हिंसाचार (Domestic Violence) प्रकरणात दोषी ठरवले आहे. कोर्टाने लिअँडर पेसला मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या रिया पिल्लईला (Rhea Pillai) दर महिन्याला दीड लाख रूपयाची भरपाईन देण्याचे आदेश दिले आहेत. (Leander Paes Guilty in Domestic Violence)

लिअँडर पेस हा काही काळ मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या रिया पिल्लईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहत होता. दरम्यान, रिया पिल्लईने लिअँडर पेसवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणावर कोर्टाने आज आदेश दिला आहे. कोर्टाने पेसला रियाला दरमहा दीड लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. याचबरोबर कोर्टाने 'पितृसत्ताक समाजामुळे विवाहापलीकडे अशा संबंधांमध्ये असलेल्या महिलांवर अन्याय होतात. अशा महिला जोडीदारासाठी कायदेशीर उपाय देखील अपुरे असल्याचे आढळून येते. ज्यामुळे तिचे शोषण होते आणि तिच्यावर अत्याचार होतात.' असे मत नोंदवले. कोर्टाने पेसला या महिन्याच्या सुरूवातीलाच दोषी ठरवले होते. आदेशाची प्रत बुधवारी प्राप्त झाली.

मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोमलसिंह राजपूत (Metropolitan magistrate Komalsing Rajput) यांनी या प्रकरणात आदेश दिले. त्यांनी दीड लाखापैकी 50 हजार ही महिन्याचे घरभाडे आणि 1 लाख मेंटेनन्स देण्याचा आदेश लिअँडर पेसला दिला. रिया पिल्लई कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी लिअँडर पेसविरूद्ध 2014 मध्ये कोर्टात गेली होती. त्यावेळी तिने ती पेस सोबत आठ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. पेस आता अभिनेत्री किम शर्मा सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी इन्स्टाग्रामवरून केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT