Argentina beat Canada to reach Copa America 2024 final sakal
क्रीडा

Copa America : मेस्सीची अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये! उपांत्य फेरीत कॅनडाचा केला पराभव

Argentina Beat Canada In Copa America 2024 : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना फुटबॉल संघांने कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

Kiran Mahanavar

Copa America 2024 Argentina vs Canada : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना फुटबॉल संघांने कोपा अमेरिका या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. कॅनडावर 2-0 असा विजय मिळवत अर्जेंटिनाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

अर्जेंटिना विरुद्ध कॅनडा सामन्याच्या 22व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेझने पहिला गोल केला. यानंतर लिओनेल मेस्सीने खेळाच्या 51व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी मजबूत केली. पण कॅनडाला एकही गोल करता आला नाही. अखेर अर्जेंटिनाने हा सामना 2-0 असा जिंकला.

जेसे मार्च यांच्या मार्गदर्शनात कॅनडाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली; पण गतविजेत्या अर्जेंटिनाचे आव्हान त्यांना परतवून लावता आले नाही. अर्जेंटिना-कॅनडा हे दोन्ही संघ साखळी फेरीमध्ये एकाट गटात होते. अ गटात दोन्ही देशांचा समावेश होता आणि अर्जेंटिना संघाने तो सामना 2-0 ने जिंकला होता. त्या सामन्यात पण ज्युलियन अल्वारेझ गोल करीत अर्जेंटिनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आणि उपांत्य फेरीत पण अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेझने पहिला गोल केला.

अर्जेंटिना संघाने २००४ ते २०२४ या वर्षांमध्ये झालेल्या आठ कोपा अमेरिका स्पर्धांमधील सातमध्ये किमान उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच, आता या स्पर्धांमध्ये अर्जेंटिना सहा वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT