Lionel Messi  esakal
क्रीडा

Lionel Messi : मेस्सी भारतात येणार... प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची चाहत्यांना मिळणार दोनदा संधी?

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Visit India : अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या लिओनेल मेस्सीचे भारतात तुफान फॅन फॉलोईंग आहे. याची प्रचिती खुद्द मेस्सीला कतारमध्ये झालेल्या वर्ल्डकपदरम्यान आली होती. तेव्हापासूनच लिओनेल मेस्सी हा भारतात कधी येणार याची चर्चा सुरू होती. आता लिओनेल मेस्सी भारतात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

केरळ अर्जेंटिनासोबतच्या दोन मैत्रीपूर्ण सामन्यांचे आयोजन करण्याची शक्यता आहे. या सामन्यात लिओनेल मेस्सी देखील खेळण्याची शक्यता आहे. हे सामने 2025 च्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

अर्जेंटिनाचा संघ केरळमध्ये दोन सामने खेळणार आहे. हे सामने तो भारतीय फुटबॉल संघासोबत खेळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबतची माहिती केरळचे क्रीडामंत्री व्ही अबदुराहिमान यांनी दिली आहे.

या घोषणेसोबतच त्यांनी सांगितले की अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनसोबत ऑनलाईन चर्चा सुरू आहे. यात मुख्य प्रशिक्षक पाब्लो डिआज आणि केरळ क्रीडा मंत्रालयाचे सचिव प्रणबज्योती नाथ आणि केरळ फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नवास मीरन यांचा देखील समावेश आहे.

केरळच्या क्रीडामंत्र्यांनी फेसबूकवरून याची माहिती दिली. ते लिहितात, 'विश्वविजेता संघ अर्जेंटिनाला केरळमधून खूप पाठिंबा मिळाला आहे. त्यांना देखील हे माहिती आहे. त्यांनी भारतात येण्याची आपली विनंती मान्य केली आहे.'

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन केरळ फुटबॉल असोसिएशनसोबत संयुक्तरित्या काम करण्यास उत्सुक आहे. याअंतर्गत केरळमधील 5000 विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण देण्याचा उद्येश आहे.

यापूर्वी जून 2024 मध्ये अर्जेंटिनाचा संघ भारतात येणार होता. मात्र यामध्ये बदल झाला असून पावसाळ्याचा हंगाम पाहता अर्जेंटिना ऑक्टोबर 2025 मध्ये भारतात येण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

Pune Truck Accident : ट्रकच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना!

Hadapsar OPD Closure : हडपसरमधील बाह्यरुग्ण सेवा बंद; डॉक्टरांचा तोडफोडी विरोधातील इशारा!

SCROLL FOR NEXT