Lionel Messi Mexico Flag Controversy esakal
क्रीडा

Lionel Messi : मेस्सीने मेक्सिकोच्या टीशर्टने फरशी पुसली? VIDEO होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Mexico Flag Controversy : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सौदी अरेबियाने पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येणार का अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र अर्जेंटिनाने दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2 - 0 असा पराभव करत वर्ल्डकपमधील आपले आव्हान अबाधित राखले. स्टार मेस्सीने देखील एक गोल करून विजयात मोलाचे योगदान दिले. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये दमदार सेलिब्रेशन केले. मात्र हेच सेलिब्रेशन आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीवर मेक्सिकोचा ध्वज आणि टीशर्ट यांचा अपमान केल्याचा आरोप होतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अर्जेंटिनाने मॅक्सिकोवरील विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन केले. याबाबचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मेस्सीसह अर्जेंटिनाचे खेळाडू आनंदाने गाणे म्हणत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्याच्या पायाच्या जवळ एक हिरव्या रंगाचा टीशर्ट दिसतो आहे. हा टीशर्ट मेक्सिकोचा असल्याचे सांगतले जात आहे.

यामुळेच मेक्सिकोचे चाहते आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर कॅनेओ अल्वारेझ मेस्सीवर चांगलाच भडकलेला आहे. अल्वारेझने मेस्सीवर मॅक्सिकोच्या जर्सीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अल्वारेझने स्पॅनिश भाषेत दोन, तीन ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तो पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला की, 'मेस्सीने आमच्या टीशर्ट आणि ध्वजाने फरशी पुसल्याचे तुम्ही पाहिले का?'

यानंतर त्याने ट्विट केले की, 'त्याने आता देवाकडे प्रार्थना करावी की तो माझ्या हाताला लागला नाही पाहिजे. मी अर्जेंटिनाचा आदर करतो. तू देखील मॅक्सिकोचा आदर केला पाहिजेस. मी देशाबद्दल (अर्जेंटिना) बोलत नाहीये मी मेस्सीबद्दल बोलतोय.'

दरम्यान, मेस्सीने मॅक्सिकोविरूद्ध गोल करत दिवंगत दिएगो मॅराडोना यांच्या वर्ल्डकपमधली 21 सामन्यात 8 गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे मॅराडोना यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनालाच मेस्सीने ही बरोबरी साधली. अर्जेंटिनाने मेक्सिकोवरील विजयानंतर आपले वर्ल्डकपमधील आव्हान जरी जीवंत ठेवले असले तरी त्यांना नॉक आऊट फेरी गाठण्यासाठी पोलंडविरूद्धच्या सामन्यात विजय आवश्यक असणार आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT