Lionel Messi Record Break Liked Instagram Photo
Lionel Messi Record Break Liked Instagram Photo esakal
क्रीडा

Lionel Messi : मेस्सीचा रेकॉर्ड ब्रेक लाईक्स मिळवणारा फोटो काढणारा शॉन आहे नाखूष

अनिरुद्ध संकपाळ

Lionel Messi Record Break Liked Instagram Photo : अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर फिफा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. जगातील सर्वोत्तम खेळाडू पैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सी विश्वविजेता झाला. यानंतर मेस्सीची वर्ल्डकप हातात घेतलेली प्रतिमा टिपण्यासाठी कॅमेरामन तसेच त्याच्या चाहत्यांची, कुटुंबीयांची झुंबड उडाली होती. या सगळ्या गोंधळातून धक्काबुक्कीतन गेट्टी इमेजचे फोटोग्राफर शॉन बोट्टेरिल यांनी मेस्सीचा सर्गियोच्या खांद्यावर बसून वर्ल्डकप ट्रॉफी मिरवतानाचा फोटो काढला. हाच फोटो मेस्सीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून शेअर केला अन् याच फोटोने इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक लाईक्स मिळवलेल्या अंड्याच्या फोटोला मागे टाकले.

आपण काढलेला फोटो इन्स्ट्राग्रामच्या इतिहासातील सर्वाधिक लाईक्स मिळवणारा फोटो ठरलाय म्हटल्यावर फोटोग्राफर शॉन यांना प्रचंड आनंद व्हायला पाहिजे. मात्र शॉन यांनी या फोटोबाबत एक तक्रार केली आहे. ते म्हणाले की, मोठ्या कष्टाने मी हा फोटो काढला होता. तुम्ही ट्रॉफी उचलतानाचा फोटो प्लॅन करून काढू शकता. मात्र हा फोटो मिळण्यासाठी नशिब बलवत्तर असावं लागतं. त्या रविवारी माझं नशिब बलवत्तर होतं.

यानंतर शॉन बोट्टेरिल यांनी मेस्सीचे काढलेले फोटो एडिटर असलेल्या त्यांच्या मुलाकडे पाठवला. माझ्या मोठ्या मुलाने मला मेसेज पाठवला आणि सांगितले की मी तुमचा फोटो एडिट केला आहे. तो खूप छान आहे.' शॉन म्हणाले हा फोटो चांगला आहे. हाच फोटो मेस्सीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोने इन्स्टाग्राम अकाऊंटवर इतिहासच रचला. या फोटोला आतापर्यंत 7 कोटी 13 लाख लाईक्स मिळाले आहेत. या फोटोने इन्स्टाग्रामवरील सर्वात फेमस अंड्याच्या फोटोला देखील मागे टाकले आहे.

मात्र हा फोटो क्रॉप केलेला आहे असे म्हणत ज्यांनी हा फोटो मोठ्या कष्टाने काढला त्या शॉन यांनी हा क्रॉप केलेला फोटो बेस्ट व्हर्जन नाही असे सांगितले. ते म्हणाले की, 'या फोटोचे हे क्रॉप केलेले व्हर्जन माझे फेव्हरेट नाही. कारण मी काढलेल्या फोटोत मेस्सी चाहत्यांच्या मोबाईल आणि कॅमेऱ्यांच्या गराड्यात होता. हा फोटो मेस्सीसाठीचा बेस्ट फोटो होता. त्याच्यात मेस्सीचे चाहते कौतुक करतानाचा फिल होतात. त्यात आनंदी चेहरे होते, ट्रॉफी होती आणि हवाहवासा गोंधळ देखील होता.'

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT