local boy ishan kishan 
क्रीडा

IND vs SA : लोकल बॉय इशान किशनने चाहत्यांना दिला प्रेमाचा 'डबल डोस', पाहा व्हिडिओ

इशान किशन सामना संपल्यानंतर नातेवाईकांची भेट घेत चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला.

Kiran Mahanavar

Ishan kishan India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी रांचीमध्ये खेळला गेला. भारताने जिथे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामना संपल्यानंतर लोकल बॉय इशान किशन क्रिकेट चाहत्यांमध्ये गेला. त्याने चाहत्यांसोबत भरपूर सेल्फी घेतले आणि ऑटोग्राफही दिले. यासोबतच त्यांनी आपल्या नातेवाईकांचीही भेट घेत चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला.

बीसीसीआयने लोकल बॉय स्टार इशान किशनच्या चाहत्यांना भेटण्याचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. इशान किशनसोबत दिसणारी महिला त्याच्या आजीसारखी दिसत आहे. प्रत्येकजण इशानसोबत फोटो काढत होते. इशान किशनची 93 धावांच्या खेळी भारताच्या विजयात मोलाचा वाटा ठरली, परंतु तो स्थानिक चाहत्यांना शतक भेट देऊ शकला नाही याबद्दल तो थोडा नाराज आहे.

इशानने सामन्यानंतर खुलासा केला की, भारतीय संघ जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा चाहते त्याला शतक करण्याची मागणी करत होते. त्याने ते जवळजवळ पूर्ण केले, परंतु 93 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर तो बाद झाला. त्यादरम्यान तो खूप नाराजही दिसला. तो म्हणाला, हे माझे घरचे मैदान आहे. मी क्षेत्ररक्षण करत असताना ते मला आज शतक झळकावायला सांगत होते. श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 161 धावांची भागीदारी केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने भारतासमोर 279 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तर भारतीय संघाचे स्टार खेळाडू इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत संघाला सुस्थितीत आणले. श्रेयसने शतक ठोकले. यादरम्यान ईशानचे वनडेतील पहिले शतक हुकले. पण त्याने 93 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 7 षटकार मारले. घरच्या मैदानावर रांचीवर फलंदाजी करताना त्याने सर्वांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT