क्रीडा

Asian Games 2023 : बॉक्सर लवलिनाची फायनलमध्ये धडक; रूपेरी झळाळीनंतर आता 'गोल्डन' कामगिरीची अपेक्षा

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताच्या महिला बॉक्सर्सनी आज एशियन गेम्सच्या 10 व्या दिवशी दमदार कामगिरी केली. प्रिती पवारच्या कांस्य पदकानंतर अनुभवी आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलिना बोरगोहेनने 75 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. तिने रौप्य पदक निश्चित केले असून तिच्याकडून आता गोल्डची अपेक्षा आहे.

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोरगोहेनने एशियन गेम्समध्ये देखील आपला जवला दाखवला. तिने 75 किलो वजनीगटात अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिने थायलंडच्या मनिकोन बायसनचा 5 - 0 असा पराभव केला.

भारताने एशियन गेम्स 2023 मध्ये आज 10 व्या दिवशी देखील पदकांचा धडाका कायम ठेवला आहे. भारताने नौकानयन 1000 मीटर कॅनोई क्रीडाप्रकारात कांस्य पदक पटकावले. भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला.

याचबरोबर भारताने आर्चरीमध्ये देखील दोन पदके निश्चित केली आहेत. महिला कापाऊंड वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या आदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा यांनी सेमी फायनल गाठली. या दोघींमध्ये होणाऱ्या सेमी फायनलमध्ये जो जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT