World Cup 2023 Venue Anil Deshmukh  esakal
क्रीडा

World Cup 2023 Venue : विदर्भावर अन्याय! माजी गृहमंत्र्यांनी जय शहांना लिहिले पत्र, वर्ल्डकप वेळापत्रकाचा वाद पेटला

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Venue Anil Deshmukh : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले. भारतातील 12 ठिकाणी हे सामने होणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच भारत संपूर्णपणे वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे. मात्र जेव्हापासून वेळापत्रक जाहीर झाले तेव्हापासून सामन्याची ठिकाणे निवडताना राजकारण झाल्याची टीका होत आहे.

आधी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांनी पंजाबला एकही सामना मिळाला नाही म्हणून टीका केली. आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पत्र लिहीत नागपूरला एकही सामना न दिल्याबद्दल विदर्भाचा नाराजी पत्राद्वारे कळवली.

अनिल देशमुख आपल्या पत्रात म्हणतात,

महोदय,

नागपूरचे जामठा येथील नवीन क्रिकेट स्टेडियम हे जगातील सर्वोत्तम स्टेडियमपैकी एक आहे मात्र यंदा होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप मधून नागपूर वगळल्याने संपूर्ण विदर्भातील क्रिकेटप्रेमींमध्ये बी.सी.सी.आय विरुद्ध प्रचंड नाराजी पसरली आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील प्रशस्त व सर्व आत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या स्टेडियमचा लौकिक केवळ भारतातच नव्हे तर जगगरात आहे. आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांचे आयोजन याच मैदानादर झाले. इतकेच नव्हे तर 2011 मध्ये वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील पार महत्त्वाचे सामने याच मैदानावर झाले यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावाही समावेश होता. इतकेच नव्हे तर मुख्य स्पर्धेपूर्वीचे सराव सामनेही या ठिकाणी खेळवण्यात आले होते.

त्यामुळे यावेळी विश्वकरंडक स्पर्धेतील काही लढती नागपुरात होतील अशी आशा चाहत्यांना होती. मात्र मंगळवारी सार्व वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बी.सी.सी.आय ने) स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम काल मंगळवारी जाहीर केला यानुसार स्पर्धेतील सामने नागपुर ता अहमदाबाद, मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, धर्मशाळा आणि लखनऊ या दहा शहरांमध्ये खेळले जाणार आहे.

मात्र या शहरांमध्ये मध्य भारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगना आदी राज्यामधुन सुद्धा मोठया प्रमाणात क्रिकेटप्रेमी मॅच चा आनंद घ्यायला येतात. तरी सुद्धा नागपूरचा कुठेही उल्लेख नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

करीता बी.सी.सी.आय ने चाहत्यांचा रोषात घेता नागपुरता विश्वकरंडक स्पर्धेतील दोन सीन सामन्यांचे आयोजन करावे अशी मागणी पुर्ण क्रिकेट चाहत्यांना आपणास करीत आहे. तरी या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती

धन्यवाद !

पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग यांनी बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टीका केली. त्यांनी मोहालीला वर्ल्डकपमधील एकही सामना न देण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला. 

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT