Maharashtra Girls Basketball Team Won Against Orissa Top Breaking News in marathi
Maharashtra Girls Basketball Team Won Against Orissa Top Breaking News in marathi 
क्रीडा

राष्ट्रीय बास्केटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची आज उपांत्यपुर्व लढत

सकाळ वृत्तसेवा

सातारा : महाराष्ट्रच्या सिया देवधर, धारा फाटे, शोमिरा बिडये यांनी अन्य खेळाडूंच्या साथीने बहारदार खेळ करीत आज (शुक्रवारी) ओरिसा संघास तब्बल 14 गुणांनी पराभवाची धूळ चारत येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेची उपांत्यपुर्व फेरी गाठली.

हेही वाचा - लग्नाच्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिलं स्पेशल गिफ्ट!
 
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि के.एस.डी.शानभाग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील के.एस.डी.शानभाग विद्यालयाच्या मैदानावर होत असलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रच्या मुलींचा जिगरबाज खेळ ; केरळला नमविले

आज (शुक्रवार) सकाळच्या सत्रात महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पहिल्या सत्रापासून महाराष्ट्र संघाने चेंडूवर नियंत्रण मिळवित 11-03 अशी नऊ गुणांची आघाडी घेतली. त्यानंतरही महाराष्ट्र संघातील तन्वी साळवे, भक्ती लहामगे यांनी सियाच्या साथीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.

खेळाच्या तिसऱ्या सत्रात ओरिसा संघाने आक्रमक खेळ करीत एकापाठोपाठ एक बास्केट नोंदविले. त्यास महाराष्ट्र संघातील भुमिका सरजे, धारा, सिया यांनी प्रत्युत्तर देत संघाचा गुणफलक हलता ठेवला. महाराष्ट्र संघाने हा सामना 54-40 असा 14 गुणांच्या फरकाने जिंकला.

स्पर्धेतील अन्य सामन्यांचे निकाल असे...

राजस्थान 48 वि.वि. केरळ 47
तामिळनाडू 89 वि.वि. के.व्ही.एस. 62
छत्तीसगढ 69 वि.वि. राजस्थान 27
पंजाब 38 वि.वि. सी.बी.एस.बी. डब्ल्यू.एस.ओ. 15
हरियाणा 44 वि.वि. चंदिगढ 14
सी.आय.एस.बी.सी. 47 विरुद्ध आय.पी.एस.सी 29
कर्नाटक 34 वि.वि. उत्तर प्रदेश 24. 

आज (शुक्रवार) होणाऱ्या उपांत्य पुर्व फेरीच्या लढती.

मैदान क्रमांक एक ः पंजाब विरुद्ध तामिळनाडू ः सायंकाळी सहा वाजता.
 
मैदान क्रमांक दोन ः महाराष्ट्र विरुद्ध सी.आ.सी.ई ः सायंकाळी सहा वाजता.
 
मैदान क्रमांक एक ः छत्तीसगढ विरुद्ध हरियाणा ः सायंकाळी साडे सात वाजता.
 
मैदान क्रमांक दोन ः राजस्थान विरुद्ध कर्नाटक ः सायंकाळी साडे सात वाजता. 

स्थळ - के.एस.डी.शानभाग विद्यालय, सातारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

ICC: आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किती शक्तीशाली आहे? नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्यास काय होणार?

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT