Kabaddi sakal
क्रीडा

Kabaddi : महाराष्ट्र कबड्डी संघांची विजयी सलामी

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : तमिळनाडू, हिमाचल प्रदेशवर मात

सकाळ वृत्तसेवा

सुरत : आंतरराष्ट्रीय खेळाडू शंकर गदई आणि स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कबड्डी संघांनी सोमवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये शानदार विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तमिळनाडू संघाला धूळ चारली. महाराष्ट्राच्या महिला संघाने हिमाचल प्रदेश संघावर एका गुणाने रोमहर्षक विजय मिळवला.

महाराष्ट्र पुरुष संघाने तमिळनाडूविरुद्ध ४९-२५ अशा गुणांनी सामना जिंकला. महिला गटात स्नेहल शिंदेच्या कुशल नेतृत्वासह सोनाली शिंगटे, रेखा, अंकिता यांनी आपल्या सर्वोत्तम खेळीसह सलामीची लढत गाजवली. सोनालीने बोनस गुणांसह सुरेख चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तसेच पकडीमध्ये अंकिता, रेखाची कामगिरी कौतुकास्पद ठरली. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत अटीतटीत रंगलेला हा सामना महाराष्ट्राला ३२-३१ असा आपल्या नावे करता आला.

आता यजमान गुजरातशी लढत

महाराष्ट्र महिला संघाने सलामीच्या लढतीत विजय साकारल्यानंतर आता त्यांचा सामना यजमान गुजरात संघाशी होणार आहे. याआधी बिहारने गुजरातवर ३८-१५ ने मात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर पुन्हा वाहतूक कोंडी, शेकडो वाहने अडकली; सलग चौथ्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

WPL 2026 : हा अभिमानाचा क्षण! RCB च्या विजयानंतर विराट कोहली भावूक, नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी तोफा थंडावल्या; उद्या होणार मतदान

Ichalkaranji Mayor Election : उदय धातुंडे होणार इचलकरंजीचे पहिले महापौर; उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांचे नाव निश्चित, आज होणार घोषणा

India Rafale Deal : भारत १०० पेक्षा जास्त राफेल विमाने खरेदी करणार, तब्बल 'इतका' येणार खर्च

SCROLL FOR NEXT