Maharashtra Kesari 2023 sakal
क्रीडा

Maharashtra Kesari: सिकंदरवर अन्याय? महेंद्र गायकवाडचा डांग डाव वादाच्या भोवऱ्यात

Kiran Mahanavar

Maharashtra Kesari Kushti 2023 : स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षेने पटकावली आहे. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटात चीतपट केलं.

माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा बघायला मिळाला. अखेर महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाला याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी आधी सावध पवित्रा घेतला. सावध पवित्र्यानंतर महेंद्र गायकवाडने तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत एक गुण घेत आघाडी मिळवली. महेंद्रने आघाडी घेतल्यानंतर सिकंदरने प्रतीडाव टाकत दोन गुण पटकाले. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली.

पुढच्या फेरीत महेंद्र गायकवाडने 4 गुण मिळवत आघाडी पिछाडी भरून काढत सिकंदर शेखवर 5-4 अशी आघाडी घेतली. पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थीत झाला नव्हता सिकंदर डेन्जर पोझिशन ला नव्हता मग चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारल्या जात आहे.

सिकंदर आणि महेंद्र यांच्यात एक एक गुणासाठी चढाओढ सुरू असताना शेवटच्या मिनिटाला दोन्ही पैलवानांनी गुण मिळवण्यासाठी चांगलीच झटापाट सुरू केली होती. एकमेकांवर पकड मिळवण्यासाठी दोन्ही कुस्तीपटू झुंजत होते. अखेर महेंद्र गायकवाडने एक गुण घेत कुस्ती जिंकली.

सोशल मीडियावर एका चाहत्याने पोस्ट करत लिहिले की, जर निर्णय बरोबर दिले असते तर , सिकंदर शेख विजयी झाला असता. फक्त किताब जाईल दोघांपैकी एकाकडे पण खरा महाराष्ट्र केसरी फक्त सिकंदर शेखच आहे. पंचांच्या एका चुकीमुळे आज पूर्ण देशाच्या कुस्तीवर राज्य करणारा सिकंदर शेख आज महाराष्ट्र केसरी होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

Shivneri Fort Landslide : किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे वाहून आला मातीचा ढिगारा

SCROLL FOR NEXT