Sikander Sheikh
Sikander Sheikh Esakal
क्रीडा

Sikander Sheikh : मोठ्या वादानंतर सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार?

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निकालानंतर वादाला तोंड फुटलं होतं. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण सोशल मिडियावर व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेखने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

सेमी फायनलच्या लढतीमध्ये चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला जादा गुण दिल्याचा आरोप सध्या होत आहेत. त्यानंतर पंचांना धमकी दिल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता. पण या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सांगलीत लवकरच मातीतील कुस्ती होणार आहे. विशेष म्हणजे या कुस्तीसाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी पुढाकार घेतला आहे.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सिकंदर शेख याच्यासह सोशल मीडियावरून होत आहेत.

यानंतर मुंबई पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केला. यावरून कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. परंतु, सांगलीच्या अंबाबाई तालीम संस्थेने हा वाद मिटवण्यासाठीचा मार्ग शोधून काढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT