क्रीडा

Maharashtra Kesari: शिवराज राक्षे ठरला महाराष्ट्र केसरी; महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावले जेतेपद

अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले

रुपेश नामदास

 पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.

शिवराज राक्षेने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. त्याला खांद्याची दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली होती. तो गतवेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न 2023 मध्ये पूर्ण झाले.

शिवराजला महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा आणि 5 लाख रूपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर शिवराजला महिंद्रा थार ही एसयुव्ही देखील पटकावली.

सेमी फायनलमध्ये माती विभागातून पै महेंद्र गायकवाड विरूध्द पै सिंकदर शेख यांच्यात कुस्ती झाली. ही कुस्ती पै महेंद्र गायकवाडने मारत थेट अंतिम सामन्यात धडक मारली, तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे विरूद्ध हर्षवर्धन सदगीरला असा सामना झाला. हा सामना पै शिवराज राक्षेने 8-2 अशा एकतर्फी फरकाने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली.

आणि महाराष्ट्र केसरीसाठी महेंद्र गायकवाड विरूद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत झाली. दरम्यान या लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Crop Insurance: पीक विम्याची मुदतवाढ मिळाली, पण संकेतस्थळच डाऊन; पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर विमा संरक्षणाचे संकट

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

SCROLL FOR NEXT