Pruthviraj Patil Wins maharashtra Kesari Title  sakal
क्रीडा

Maharashtra Kesari: पृथ्वीराज यंदाही 'महाराष्ट्र केसरी'चा दावेदार!

सातारा येथे झालेल्या गत स्पर्धेत कोल्हापुरचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली होती आताही...

मतीन शेख

Maharashtra Kesari Kusti 2023 Pruthviraj Patil : ६५ वी 'महाराष्ट्र केसरी' ही मानाची कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगतेय. सातारा येथे झालेल्या गत स्पर्धेत कोल्हापुरचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली होती. हा मान पटकावत महाराष्ट्र केसरी गदेचा कोल्हापुरच्या वाट्याला आलेला २१ वर्षांचा दुष्काळ पृथ्वीराजने संपवला होता. यंदा देखील मोठ्या ताकदीने तो स्पर्धेत उतरला आहे. आपल्या खेळाच्या जोरावर परत एकदा पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी किताबाचा प्रबळ दावेदार मानला जातोय.

पृथ्वीराज मॅट विभागातून स्पर्धेत उतरत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. २२ वर्षाच्या पृथ्वीराजने आता पर्यंत भल्या भल्यांना आस्मान दाखवले आहे. धिप्पाड शरीरयष्टीचा, अंगात चांगलच बळ असणारा, बुद्धीने चपळ असा पृथ्वीराज. तीन वर्षापुर्वी तो जागतिक विजेता देखील ठरलाय. तसेच नुकतेच सिनिअर नॅशनल व सर्विस गेम मध्ये त्याने सुवर्ण कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे. कोल्हापूर नजिकच्या शिंगणापूर येथील शाहू आखाड्यात तो जालिंदर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. त्याच्या कामगिरीसाठी भारतीय सैन्यदलाने त्याला नोकरी सुद्धा दिली आहे.

गत स्पर्धेत अनेक तगड्या मल्लांना पराभूत करून त्याने मॅट विभागातून अंतिम फेरी गाठली होती. या अंतिम लढतीत उंचपुरा, चपळ, आक्रमक असणारा सोलापूरचा मल्ल विशाल बनकर ला पृथ्वीराजने पराभूत केले होते. यंदा देखिल आपल्या खेळाचा करिष्मा दाखवत पृथ्वीराज कोल्हापुरला महाराष्ट्र केसरीचा दुहेरी मान मिळवून देणार का? याकडे सर्व कुस्ती शौकिनांच्या नजरा लागल्या आहेत.

पै.पृथ्वीराज पाटीलची कुस्तीतील बलस्थाने...

पृथ्वीराज हा सामना प्लेअर म्हणुन ओळखला जातो. मॅटवर तांत्रिकदृष्टया लढण्याचे कौशल्य त्याने चांगलेच अंगीकारले आहे. या तंत्राच्या जोरावर त्याने सिनिअर नॅशनल तसेच जागतिक स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. बॅक थ्रो, दुहेरी पट काढने, भारंदाज मारने असे त्याचे हुकमी डाव आहेत. कोणती घाई न करता प्रतिस्पर्धी मल्लाचा अंदाज घेत तो खेळी करतो. मॅट वर आपला पवित्रा भक्कम ठेवत तो लढतो. सुरवातीला बचावात्मक आणि समोरच्या मल्लाचा अंदाज घेत तो आक्रमक होतो. शांत, संयमाने खेळ करत तो डावबाजी करतो व प्रतिस्पर्धी मल्लाच्या डावबाजीची तोड लगेच करत स्वतःचा बचाव करत गुण हासिल करण्यात त्याचा हातखंडा आहे.

पृथ्वीराजच्या पुढे यंदा कुणाचे आव्हान?

गत स्पर्धेत धक्कादायक निकाल लावणार पुण्याचा युवा मल्ल हर्षद ऊर्फ माऊली कोकाटे यंदा देखील चांगल्या तयारीने स्पर्धेत उतरला आहे. पृथ्वीराज आणि माऊलीचा खेळ तोडीस तोड असल्याने पृथ्वीराज समोर माऊलीचे मोठे आव्हान असेल. तसेच जागतिक पदक विजेता सोलापूरचा महेंद्र गायकवाड, पुणे शहराचा पृथ्वीराज मोहोळ, २०१८ चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, सिकंदर शेख, किरण भगत, माऊली जमदाडे अशा वरिष्ठ मल्लांचा सामना पृथ्वीराजला करावा लागणार आहे.

पृथ्वीराज पाटीलशी संवाद साधला असता तो सांगतो, ट्रिपल महाराष्ट्र केसरीसह माझे ऑलिम्पिकचे स्वप्न आहे. माझी तयारी चांगली आहे. प्रतिस्पर्धी मल्लांच्या खेळाचा अभ्यास करुन मी यंदा लढण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. गत तीन वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर मी परत एकदा जिंकेन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT