mumbai HC sakal media
क्रीडा

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकांना स्थगिती नाही : मुंबई HC

नवीन कार्यकारणी पुढील सुनावणीपर्यंत जाहीर न करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच नवीन कार्यकारणी पुढील सुनावणीपर्यंत जाहीर न करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. संघटना बरखास्त करण्याचा राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचा निर्णय नौसर्गिक न्यायाला अनुसरून नाही असा निर्वाळाही उच्च न्यायालयाने दिला आह

दरम्यान, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आलं होतं. मात्र, आता कोणताही निर्णय जाहीर करू नका असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत संघटनेची संपूर्ण कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या संघटनेवर वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात होते. त्यानंतर या बरखास्त झालेल्या परिषदेचे सचिवांनी नोटीस दिली होती. या नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने येत्या 30 तारखेला म्हणजेच उद्या होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच निवडणुकांनतर जी कार्यकारणी निवडणून येईल ती जाहीर न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे येत्या 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या प्रकरणावरील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आता असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT