mahindra singh dhoni
mahindra singh dhoni  mahindra singh dhoni
क्रीडा

प्रियांकामुळे एमएस धोनीची चर्चा; तो फोटो होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आजकाल पत्नी साक्षी रावत आणि मुलगी जिवासोबत आनंदी जीवन जगत आहे. परंतु, अनेकांना अजूनही धोनीच्या आयुष्यातील काही भाग माहीत नाही. साक्षीशी लग्न करण्यापूर्वी धोनीच्या आयुष्यात एक मुलगी होती. जिच्यावर माही खूप प्रेम करीत होता. परंतु, नशिबाने दोघांना वेगळे केले. धोनीच्या वैयक्तिक आयुष्यावर आलेला चित्रपट ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’त याचा उल्लेख आहे.

महेंद्र सिंग धोनीच्या मैत्रिणीचे नाव प्रियांका झा (Priyanka Jha) होते. धोनीचे तिच्यावर खूप प्रेम होते. धोनीला प्रियांकासोबत लग्नही करायचे होते. परंतु, दुर्दैवाने प्रियांकाचा कार अपघातात मृत्यू झाला. या अपघाताला आता बरेच वर्षे झाली आहेत. मात्र, धोनी गर्लफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही एकत्र बसलेले दिसत आहेत. यामुळे धोनी ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रियांका झा मुळे (Old Photo viral) चर्चेत आहे.

प्रियांका झाचा (Priyanka Jha) मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर धोनी (Mahendra Singh Dhoni) एकटा पडेल असे वाटत होते. या घटनेनंतर धोनीच्या जवळच्या लोकांचा असा विश्वास होता की धोनी क्रिकेटपासून बराच काळ दूर राहील. परंतु, धोनीने या घटनेला आपली कमजोरी बनू दिली नाही आणि क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आणि भारताला विश्वचषक जिंकून दिला.

धोनीचे रेकॉर्ड

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली पहिल्यांदा खेळला गेलेला आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजे २०११ मध्ये आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तसेच २०१३ मध्ये पार पडलेली आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफीही आपल्या नावावर केली. याशिवाय २००९ मध्ये भारत प्रथमच कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT