Mahesh Pithiya R Ashwin esakal
क्रीडा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा डुप्लिकेट 'मदतनीस' अश्विनच्या चरणी झाला लीन; अश्विनने हळूच...

अनिरुद्ध संकपाळ

Mahesh Pithiya R Ashwin : ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाल्या झाल्या त्यांनी बंगळुरात कसून सराव केला. यंदा भारताच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ सराव सामना खेळला नाही. याउलट त्यांनी फिरकीचा सराव करणे पसंत केले. यासाठी कांगारूंनी एका भारतीय गोलंदाजाचीच मदत घेतली. अश्विनचा डुप्लिकेट म्हणून महेश पिथिया याला नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाने आपल्या सराव सत्रात सामील करून घेतले.

कांगारूंचा यामागचा उद्येश हा मुख्य परिक्षेत अश्विनला सामोरे जाण्यापूर्वी त्याचा सराव करून घेणे हा होता. दरम्यान, जो महेश ऑस्ट्रेलियाचा मदतनीस झाला होता. तो नुकताच आपला आयडॉल आर. अश्विनला भेटला. त्याने भेटल्या भेटल्या आपल्या प्रेरणास्थानाचे चरणस्पर्श केले.

महेशने पीटीआयशी बोलताना म्हणाला की, 'मला माझ्या आयडॉलचा आशीर्वाद मिळाला. मी सुरूवातीपासूनच अश्विनसारखी गोलंदाज करायचा प्रयत्न करत होते. ज्यावेळी ते भारतीय संघाच्या नेट प्रॅक्टिससाठी आले त्यावेळी मी त्यांना भेटून त्यांच्या पाया पडलो.'

'यावेळी त्यांनी माझी गळाभेट घेतली आणि विचारले की मी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी गोलंदाजी करतोय. यावेळी विराट कोहली देखील मला पाहून हसला. त्यानेही मला शुभेच्छा दिल्या.'

अश्विनने यानंतर महेशला एक मोठा प्रश्न विचारला. त्याने महीशला ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली हे विचारले. त्यानंतर महेशने त्याला याबाबतची माहिती दिली. महेशने सांगितले की त्याने नेट्समध्ये स्टीव्ह स्मिथला जवळपास 6 वेळा बाद केले. महेश हे बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतोय. त्याने आतापर्यंत 4 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT