Malaysia Masters Tai Tzu Ying Defeat PV Sindhu Once Again esakal
क्रीडा

Malaysia Masters : पी. व्ही. सिंधूला ताईचं कोडं काही उलगडेना!

अनिरुद्ध संकपाळ

क्वालालांपूर : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) दिमाखात मलेशिया मास्टर्सच्या (Malaysia Masters) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र आज उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात ताई त्झू यिंगने (Tai Tzu Ying) सिंधूचा पराभव करत तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सिंधूला काही केल्या ताईचं कोडं काही सुटत नाहीये.

मलेशिया मास्टर्समध्ये सिंधू आणि ताईच्या सामन्यात पहिल्या गेम ताईनेने 13-21 असा चांगल्या गुणफरकाने जिंकला होता. मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने कडवा प्रतिकार केला.तिने दुसरा गेम 21-12 असा जिंकला. मात्र तिसऱ्या गेममध्ये सिंधूने पुन्हा कच खालली. ताईने जोरदार पुनरागमन करत तिसरा गेम 12-21ने जिंकला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या ताई यिंगने सिंधूचा तिच्या कारकिर्दित केलेला हा 17 वा पराभव होता. गेल्या सात सामन्यात सिंधूला ताईचा पारभव करणे काही जमलेले नाही. सिंधूने ताई यिंगचा 2019 ला वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाच्या लढतीत पराभव केला होता. त्यानंतर ताईने सिंधूला कायम मात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Latest Marathi News Live Update : ठाण्यात शिवसेनेवर भाजपचं दबाव तंत्राची चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT