Malaysia Open Super 750 tournament PV Sindhu Won Saina Nehwal Lost In First Round esakal
क्रीडा

Malaysia Open | पहिल्या फेरीत सिंधूचा विजय सायनाचा पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Malaysia Open : भारताच्या दोन अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांचे मलेशिया ओपन सुपर 750 मधील पहिल्या फेरीचे सामने आज झाले. यामध्ये पीव्ही सिंधूने (PV Sindhu) विजय मिळवला तर लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या सायना नेहवालला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. (Malaysia Open Super 750 tournament PV Sindhu Won Saina Nehwal Lost In First Round)

माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने थायलंडच्या जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या चोचुवांगचा 21-13, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. तर दुसरीकडे लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालचा (Saina Nehwal) जागतिक क्रमवारीत 33 व्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेच्या आयरिस वांगने 11-21 17-21 असा पराभव केला.

सातव्या स्थानावर असणारी सिंधू आता थायलंडच्या 21 वर्षाच्या चैवानशी लढणार आहे. जागतिक ज्यूनियर रँकिंगमध्ये चैवान अव्वल स्थानावर होती. याचबरोबर बँकॉकमध्ये झालेल्या उबर कपमध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या संघात देखील तिचा समावेश होता.

दुसरीकडे बी सुमित रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला देखील पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानावर असलेल्या रॉबिन टाबलिंग आणि सेलेना पेक या नेदरलँडच्या जोडीने भारतीय जोडीचा 15-21, 21-19, 17-21 असा पराभव केला. हा सामना 52 मिनिटे चालला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT