Malvika Bansod of Nagpur selected in the possible Indian team 
क्रीडा

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा : नागपूरच्या मालविका बनसोडची संभाव्य भारतीय संघात निवड

नरेश शेळके

नागपूर : येत्या ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान अरहस (डेन्मार्क) येथे होणाऱ्या थॉमस-उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेसाठी नागपूरच्या मालविका बनसोडची संभाव्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे.

भारतीय संघाचे शिबिर हैदराबाद येथील पी. गोपीचंद अकॅडमीत सोमवारपासून झाले आहे. शिबिरासाठी मालविका हैदराबाद येथे दाखल झाली आहे. कोरोनाची तपासणी आणि त्यानंतर शिबिरातील कामगिरीच्या आधारावर १७ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची अंतिम निवड करण्यात येईल. या स्पर्धेसाठी मालविकाची निवड झाल्यास ती उबेर कपसाठी निवड होणारी नागपूरची तिसरी खेळाडू ठरेल. यापूर्वी अरुंधती पानतावणे आणि वैष्णवी भाले यांची उबेर कपसाठी भारतीय संघात निवड झाली होती.

मालविका सध्या भारतीय बॅडमिंटन क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. यामुळे तिची निवड पक्की मानली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे खेळाडूंनी डेन्मार्कला प्रवास करण्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने म्हटले आहे.

मालविकाने मात्र जाण्यास पसंती दर्शवली आहे. उबेर कप स्पर्धेतून भारताची विश्व ऑलिंपिक पदक विजेते पी. व्ही सिंधूने माघार घेतल्याने भारताचे नेतृत्व बहुदा साईना नेहवालकडे येण्याची शक्यता आहे. संजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मालविकाने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना उत्तम यश संपादन केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT