Manika Batra Sakal
क्रीडा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

Manika Batra: भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

Pranali Kodre

Manika Batra Rankings: भारताची स्टार टेबल-टेनिस खेळाडू मनिका बत्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने साऊदी स्मॅशमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये 24 वा क्रमांक मिळवला आहे.

ही तिची सर्वोत्तम क्रमवारी आहे. इतकेच नाही, तर जागतिक क्रमवारीत पहिल्या 25 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला टेबल-टेनिसपटू आहे.

मनिका सौदी स्मॅश स्पर्धेपूर्वी 39 व्या क्रमांकावर होती. पण तिने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत क्रमवारीतही मोठी प्रगती केली. तिने 15 स्थानांची झेप घेत 24 वा क्रमांक पटकावला.

तिने या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या वँग मान्यू हिलाही पराभूत करण्याचा कारनामा केला होता. दरम्यान, सौदी स्मॅशमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहणारीही ती पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू आहे.

दरम्यान, आता मनिकाचा ध्येय आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याचे आहे. त्यासाठी हे यश तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. याबद्दलच तिने 24 वा क्रमांक पटकावल्यानंतर तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तिने तिचे प्रशिक्षक अमन बालगू यांचेही आभार मानले आहेत.

मनिका भारताची खेलरत्न विजेती खेळाडू आहे. तिने 2018 च्या राष्ट्रकूल स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT