Marnus Labuschagne weirdly Bowled By Stuart Borad esakal
क्रीडा

Video: ब्रॉडने लॅम्बुशग्नेचा त्रिफळा उडवलाच, तोंडावरही पाडले

अनिरुद्ध संकपाळ

होबर्ट : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंड गोलंदाजांना अखेर फॉर्म गवसला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि ऑली रॉबिनसनने उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ८५ अशी केली होती. इंग्लंडकडून ऑली रॉबिनस आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉडने उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅम्बुशग्नेची (Marnus Labuschagne) विकेट घेतली. मात्र स्टुअर्ट ब्रॉडने मार्नस लॅम्बुशग्नेचा उडवलेला त्रिफळा चांगलाच व्हायरल होत आहे. (Marnus Labuschagne weirdly Bowled By Stuart Borad)

इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर ऑली रॉबिन्सनने स्टीव्ह स्मिथला देखील शून्यावर बाद करत मोठा धक्का दिला. या धक्क्यातून मार्नस लॅम्बुशग्ने आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. मार्नस लॅम्बुशग्नेने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. हेडही त्याला आक्रमक फलंदाजी करत चांगली साथ देत होता.

मात्र सामन्याचे २३ वे षटक टाकणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने लॅम्बुशग्नेचा असा काही त्रिफळा उडवला की लॅम्बुशग्ने तोंडावरच पडला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लॅम्बुशग्ने स्टंप सोडून बाहेर जात ब्रॉडला फटकावण्याच्या प्रयत्नात होता. हे ब्रॉडने लगेचच हेरले. त्याने लॅम्बुशग्ने बाहेर जात आहे हे पाहून फूल लेंथ चेंडू थेट लेग स्टंपवर टाकला. यामुळे गडबडलेल्या लॅम्बुशग्नेने आडवा टाकलेला पाय पुन्हा आत घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चेंडू स्टंप उखडून गेला होता. दरम्यान, या चेंडू अडवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात लॅम्बशग्ने तोंडावरच पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT