Martin Guptill sakal
क्रीडा

Martin Guptill: भारताविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेटमध्ये संकट! मार्टिन गप्टिल...

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या अनुभवी सलामीला केले क्लीन बोल्ड

Kiran Mahanavar

Martin Guptill : न्यूझीलंड क्रिकेट पुन्हा संकटात सापडला आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पराभवानंतर यावेळी संघाचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलसोबत किवी क्रिकेट बोर्डाने त्याचा केंद्रीय करार मोडला आहे. गप्टिल गेल्या 14 वर्षांपासून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर होता. गप्टिलच्या मागणीवरून न्यूझीलंड बोर्डाने करार संपुष्टात आणण्याचे मान्य केले आहे. न्यूझीलंडच्या केंद्रीय करारातून मुक्त झाल्यानंतर मार्टिन गप्टिलने आता त्याचा सहकारी ट्रेंट बोल्टचा मार्ग अवलंबला आहे.

मार्टिन गुप्टिल गेल्या 14 वर्षांपासून न्यूझीलंडच्या संघाचा नियमित सदस्य होता. तो 2022 च्या टी-20 विश्वचषक संघाचा देखील एक भाग होता, परंतु त्याला तेथे एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. या सर्व घडामोडीनंतर मार्टिन गप्टिलने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आणि त्याला केंद्रीय करारातून तत्काळ मुक्त करण्याचे मान्य करण्यात आले. गप्टिलची केंद्रीय करारातून मुक्तता म्हणजे तोही आता बोल्टप्रमाणे जगातील कोणत्याही लीगमध्ये खेळू शकतो.

मार्टिन गुप्टिल हा न्यूझीलंडकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू आहे. केंद्रीय करारातून मुक्त झाल्यानंतर, डावखुरा किवी या सलामीवीराने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. न्यूझीलंड संघाला त्याची गरज असेल तेव्हा तो उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT