Match Fixing In Indian Football  esakal
क्रीडा

Indian Football : भारतीय फुटबॉलला फिक्सिंगची कीड; पाच क्लब CBI च्या रडारवर

अनिरुद्ध संकपाळ

Match Fixing In Indian Football : क्रिकेटनंतर आता भारतीय फुटबॉल जगताला देखील मॅच फिक्सिंगची कीड लागली आहे. या प्रकरणी आता केंद्रीय तापस यंत्रणा CBI ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या उंबऱ्यापर्यंत आली असून कमीतकमी 5 भारतीय फुटबॉल क्लब हे सीबीआयच्या रडावर आहेत. या सर्व क्लबला आंतरराष्ट्रीय फिक्सरशी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या पाच फुटबॉल क्लबची चौकशी होत आहे ते सगळे क्लब हे आय - लीगशी सल्लग्नित आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरचा मॅचफिक्सर विल्सन राज पेरूमलने 3 डी होल्डिंग्स लिमिटेड या शेल कंपनीच्या माध्यामातून भारतीय क्लबमध्ये गुंतवणूक केली आहे. हा आंतरराष्ट्रीय फिक्सर ऑलिम्पिक, वर्ल्डकप क्वालिफायर, महिला वर्ल्डकप आणि आफ्रिकेतील कप ऑफ नेशन्ससारख्या स्पर्धेत देखील आर्थिक गडबड केली आहे. पेरूमल ला पहिल्यांदा 1995 मध्ये सिंगापूरमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये जावे लागले होते. तो फिनलँड आणि हंगेरी येथील प्रकरणात देखील त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

I League च्या पाच क्लबशी संपर्क

एआयएफएफचे महासचिव शाजी प्रभाकरन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मॅच फिक्सिंग कदापी सहन करत नाही. आम्ही सर्व क्लबना सांगितले आहे की चौकशीत सहकार्य करा. फिक्सरशी संबंधित शेल कंपन्यांद्वारे क्लबमध्ये गुंतवणूक झाल्याने आम्ही चिंतेत आहोत. भारतीय फुटबॉल फिक्सिंगपासून दूर राहील यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहोत.'

ते पुढे म्हणाले की, 'सीबीआयने या सर्व 5 क्लबशी संपर्क केला आहे. संघात विदेशी खेळाडू, विदेशी सपोर्ट स्टाफ आणि स्पॉन्सर्स देखील आहेत. त्या सर्वांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. इंडियन सुपर लीगनंतर भारतीय फुटबॉल जगतातील आय लीग ही दुसरी सर्वात मोठी फुटबॉल लीग आहे. कोरोनाच्या महामारीमुळे बंगालमध्ये बायो बबलमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. या वर्षी गोवा प्रो लीगच्या सहा सामन्यात सट्टेबाजी झाल्याचे आढळून आले होते. सट्टेबाजी ही मॅच फिक्सिंगचाच एक मोछा संकेत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT