Mexican Open Rafael Nadal Won Acapulco Final clinch 91 ATF Title
Mexican Open Rafael Nadal Won Acapulco Final clinch 91 ATF Title esakal
क्रीडा

Mexican Open: सलग 15 सामने जिंकणाऱ्या राफाची 91 व्या विजेतेपदाला गवसणी

अनिरुद्ध संकपाळ

सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालने (Rafael Nadal) आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. त्याने मॅक्सिकन ओपन ( Mexican Open) स्पर्धेच्या फायनलमध्ये कॅमेरॉन नॉरीयेचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. याचबरोबर त्याने आपल्या 91 व्या एटीपी टायटल (ATP Title) आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे 35 वर्षाच्या दुखापतींनी ग्रासलेल्या नदालने यंदाच्या हंगामात सलग 15 सामना जिंकण्याचा पराक्रम देखील केला आहे. त्याने कारकिर्दित पहिल्यांदाच सलग 15 सामने जिंकले आहेत.

राफेल नदालने 2022 मधील आपले तिसरे टायटल जिंकले. यात ऑस्ट्रेलिया ओपन जिंकत विश्वविक्रमी 21 व्या ग्रँडस्लॅम नाव कोरणे देखील सामील आहे. तो आता सर्वाधिक टायटल जिंकणाऱ्यांच्या खेळाडूंच्या यादीत 94 टाटल्स जिंकून तिसऱ्या स्थानावर असलेल्या इव्हान लेंडलच्या थोडाच मागे आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर रॉजर फेडरर (103) दुसऱ्या तर जिमी कॉनोर्स (109) पहिल्या स्थानवर आहेत.

नदालने चौथ्यांदा मॅक्सिकन ओपन (Acapulco) जिंकली आहे. त्या यापूर्वी 2005, 2013 आणि 2020 ला मॅक्सिकन ओपन जिंकली होती. या स्पर्धेत त्याला चांगला चाहतावर्ग लाभतो. त्याने यंदाच्या फायनमध्ये सलग आठ सामने जिंकणाऱ्या ब्रिटनचा नॉरीयेचा पराभव केला. जर कॅमेरॉन नॉरीयेने नदालचा पराभव करून मॅक्सिकन ओपन जिंकली असती तर तो 29 वर्षानंतर मॅक्सिकन ओपन जिंकणारा पहिला ब्रिटिश खेळाडू ठरला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT