Michael Hussey Praise Dawid Malan esakal
क्रीडा

Michael Hussey : विराट अन् बाबर पेक्षाही भारी! हसीने केले इंग्लंडच्या 'या' फलंदाजाचे तोंडभरून कौतुक

अनिरुद्ध संकपाळ

Michael Hussey Praise Dawid Malan : इंग्लंडने टी 20 मालिकेत नुकतीच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत मात दिली. टी 20 वर्ल्डकप पूर्वी इंग्लंडने विश्वविजेत्या संघाला धूळ चारल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला असेल. दरम्यान, इंग्लंडच्या कोचिंग टीममधल्या माईकल हसीने इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मलानला त्याच्या 50 व्या टी 20 सामन्यासाठी एक खास कॅप देऊन त्याचा गौरव केला. याचवेळी हसीने एक मोठे वक्तव्य केले. त्याने डेव्हिड मलानची विराट कोहली आणि बाबर आझम यांच्याशी तुलना केली.

मायकल हसीने शुक्रवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान डेव्हिड मलानविषयी वक्तव्य केले. तो म्हणाला, 'इंग्लिश कॅप, मी माझ्या आयुष्यात असं कधी करेन असं मला वाटलं नव्हतं. मलान तुझे इंग्लंडकडून 50 वा टी 20 सामना खेळत असल्याबद्दल अभिनंदन. मलान तू तुझ्या छोट्याशा कारकिर्दित बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेस. इंग्लंडकडून करण्यात आलेल्या चार टी 20 शतकांपैकी एक शतक तुझे आहे. बराच काळ जागतील नंबर वन खेळाडू राहिला आहे. याचबरोबर सर्वात वेगवान 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरलास. माझ्या मते सामन्यांच्या बाबतीत विराट कोहली आणि बाबर आझमपेक्षाही सरस.'

हसी पुढे म्हणाला की, 'मात्र जॉस बटलर सातत्याने सांगतोय की आपल्याला पुढं जायंच आहे. आपल्या समोर जे आव्हान आहे त्याचा सामना करायचा आहे. गेल्या आठ दहा सामन्यात तुम्ही वैयक्तिकरित्या अनेक यशाची शिखर पार केली आहे. मात्र मला आशा आहे की महिन्याभरानंतर तुमच्या गळ्यात वर्ल्डकप जिंकलेलं पदक असणार आहे.'

इंग्लंड आपली टी 20 वर्ल्डकप मोहिम 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. त्यांचा पहिला सामना अफगाणिस्तानविरूद्ध असणार आहे. इंग्लंडच्या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या संघाचा देखील समावेश आहे. याचबरोबर अजून दोन संघ पात्रता फेरी खेळून या ग्रुपमध्ये दाखवल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: माळेगाव कारखान्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संचालकपदी बिनविरोध; संचालक मंडळाच्या विशेष सभेत निर्णय!

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

Latest Marathi News Live Update : सातारा नगरपरिषदेच्या ‘अघोरी नृत्या’ला अंनिसचा विरोध

Railway Loco Pilots: प्रशासनाकडून दबाव, तणावपूर्ण कामकाज अन्...; मुंबई लोकलच्या लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज दाखल

Guru Margi 2026: मिथुन राशीत गुरु मार्गी, सिंह, कन्यासह 5 राशींना लाभेल भाग्य, करिअरमध्ये होणार प्रगती

SCROLL FOR NEXT