Michael Vaughan ODI World Cup 2023 Team India  ESAKAL
क्रीडा

Michael Vaughan : इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो, भारतातील वर्ल्डकपमध्ये भारत फेव्हरेट हा मूर्खपणा

अनिरुद्ध संकपाळ

Michael Vaughan ODI World Cup 2023 Team India : इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप आणि 2022 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकून क्रिकेट जगतात दोन्ही फॉरमॅटमध्ये विद्यमान विजेते होण्याचा मान पटकावला. इंग्लंडच्या या दमदार कामगिरीनंतर माजी कर्णधार मायकल वॉन जाम खूष झाला आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड हा आता आपले वर्चस्व गाजवणार असल्याचे भाकित केले. याचबरोबर त्यांनी भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपबाबत एक मोठे आणि धाडसाचे विधान केले.

गेल्या तीन वनडे वर्ल्डकपमध्ये एक गोष्ट सातत्याने घडत आहे. 2011 ला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतात वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने मायदेशातील वर्ल्डकपवर नाव कोरले. पाठोपाठ इंग्लंडनेही 2019 ला हाच कित्ता गिकवला. आता 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. त्यामुळे लोक हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतच फेव्हरेट असल्याचे बोलू लागले आहेत. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ही शक्यता खोडून काढली.

मायकल वॉन म्हणाला की, 'पुढची मोहिम ही पुढच्या वर्षी भारतात होणारा वनडे वर्ल्डकप जिंकण्याची असले. त्यांच्याकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. तुम्हा संभाव्या विजेत्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारताविरूद्ध चांगले खेळायचे आहे. ज्यावेळी स्पर्धा सुरू होईल त्यावेळी लोक घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारताला संभाव्य विजेता म्हणून संबोधतील. मात्र हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांना इंग्लंड हरवू शकते यात शंकाच नाही. पुढची काही वर्षे असेच होईल.'

वॉन पुढे म्हणतो की, 'इंग्लंड इतकं चांगलं कसं खेळतोय? ते काय करत आहेत? जर मी ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख असतो तर मी माईक हसीच्या मागे लागलो असते. तो या स्पर्धेसाठी इंग्लंडचा विशेष बॅटिंग कोच होता. त्याला मी तू पडद्यामागे काय सूत्र हालवतोस हे विचारले असते. जर मी भारतीय क्रिकेट चालवत असतो तर मी माझा स्वाभिमान गिळला असता आणि इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT