Mitchell Johnson vs David Warner Marathi News sakal
क्रीडा

Johnson- Warner Controversy : वॉर्नरवर टीका करणे पडले महागात; जॉन्सनला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मालिकेनिमित्त मिळाली मोठी शिक्षा?

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळल्या जाणार आहे पण या मालिकेआधी....

Kiran Mahanavar

Mitchell Johnson-David Warner Controversy : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पुढील चक्र 2023-2025 आता सुरू झाले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळल्या जाणार आहे. पण या मालिकेआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू मिचेल जॉन्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात काही दिवसांपूर्वी वादाला सुरूवात झाली.

जॉन्सनने आपल्या कॉलममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वॉर्नरच्या निवडीवर निशाणा साधला होता. जॉन्सन म्हणाला होता की, वॉर्नरची निवड त्याच्या फॉर्ममुळे नव्हे तर नात्याच्या आधारावर झाली आहे. माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने असेही सांगितले की सध्याच्या खेळाडूंचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत. या वादानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. मात्र, कसोटीदरम्यान जॉन्सन आणि वॉर्नर आमनेसामने येतील असे वाटत होते. मात्र, आता तसे होताना दिसत नाही.

खरंतर, जॉन्सनने सांगितले होते की, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेसाठी मी 'ट्रिपल एम' कॉमेंट्री मध्ये असणार आहे. मात्र, कंपनीने मंगळवारी जाहीर केलेल्या कॉमेंट्रीच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यात मर्व्ह ह्युजेस, वसीम अक्रम आणि मार्क टेलर सारख्या दिग्गजांच्या नावांचा समावेश होता, परंतु जॉन्सनला त्यातून वगळण्यात आले आहे.

वॉर्नरला त्याच्या कॉलममधून टारगेट केल्यानंतर दोन दिवसांनी माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने त्यामागचे कारण सांगितले होते. ऑस्ट्रेलियन सिलेक्टर जॉर्ज बेली यांनी त्यांच्या कॉलमवर दिलेली प्रतिक्रिया बालिश आणि मूर्खपणाची असल्याचेही त्यांनी वर्णन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT