Mitchell Starc Bowling With Bleeding Finger esakal
क्रीडा

Mitchell Starc : मानलं स्टार्क! डाव्या हाताचे बोट झालं रक्तबंबाळ तरीही देशासाठी लढतोय

अनिरुद्ध संकपाळ

Mitchell Starc Bowling With Bleeding Finger : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव खेळण्यास सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात भारताने आपल्या फलंदाजीत सुधारणा करत धावा करण्यास सुरूवात केली. याचवेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आपल्या संघासाठी आपल्या दुखापतीची परवा न करता भिडताना दिसला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आई अजारी असल्यामुळे मायदेशात परतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा धुरा डावखुऱ्या मिचेल स्टार्कवर खांद्यावर आली होती. त्याने ही जबाबदारी दुसऱ्या डावात चांगल्या प्रकारे निभावली. त्याने संघासाठी डोकेदुखी ठरू लागलेल्या श्रेयस अय्यरला बाद करत भारताला मोठा धक्का देखील दिला.

विशेष म्हणजे मिचेल स्टार्क ज्या डाव्या हाताने गोलंदाजी करतो त्याच हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटातून रक्त येऊ लागले होते. भारताचा दुसरा डाव सुरू झाल्यानंतर गोलंदाजी करताना स्टार्कच्या बोटातून रक्त येताना दिसत होता. या व्हिडिओत स्टार्क आपले रक्त पँटला पुसत असल्याचे दिसते. या व्हिडिओत स्टार्कला वेदना होत असतानाही दिसत आहे.

मात्र स्टार्कने अशा परिस्थितीतही षटकाचा सहावा चेंडू टाकला. बोटातून रक्त येत असतानाही स्टार्कने मैदान सोडले नाही. त्याने आपली जबाबदारी पूर्ण केली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी करत शतकी मजल मारली. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याला श्रेयस अय्यरने 26 धावांची खेळी केली.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT