Mohammad Hafeez steps down from PCB Technical Committee 
क्रीडा

ODI World Cup : पाकिस्तान क्रिकेटमध्ये गदारोळ सुरूच! वर्ल्डकपच्या १३ दिवसआधी दिग्गज खेळाडूने सोडली संघाची साथ

Kiran Mahanavar

Mohammad Hafeez steps down from PCB Technical Committee : आशिया कपमधील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुरू झालेला राडा थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. कधी बाबर आझम नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या तर कधी शाहीन आफ्रिदी नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीजने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या टेक्निकल समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजने X वर लिहिले की, मी पाकिस्तान क्रिकेट टेक्निकल समितीतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मी सदस्य म्हणून काम केले. मला ही संधी दिल्याबद्दल मी अध्यक्ष झका अश्रफ यांचे आभार मानू इच्छितो. नेहमीप्रमाणेच पाकिस्तान क्रिकेटला माझ्या शुभेच्छा. पाकिस्तान जिंदाबाद....

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेसाठी आज म्हणजेच शुक्रवारी 22 सप्टेंबर रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11.45 वाजता लाहोरमध्ये होणाऱ्या परिषदेत मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक संघाची घोषणा करतील. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेसाठी बाबर आझम कर्णधारपदावर राहणार हे निश्चित आहे.

बाबर आझम पहिल्यांदाच भारतात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला होता. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला होता. वर्ल्डकपच्या इतिहासात भारतावर संघाचा हा पहिलाच विजय ठरला. पाकिस्तानने 1992 मध्ये एकमेव एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT