Mohammad Rizwan Pakistan vs New Zealand
Mohammad Rizwan Pakistan vs New Zealand sakal
क्रीडा

Mohammad Rizwan: पाकिस्तानमध्ये भूकंप! शाहिद आफ्रिदी येताच उपकर्णधार रिझवान कट्ट्यावर

Kiran Mahanavar

Mohammad Rizwan Pakistan vs New Zealand : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून कराची येथे खेळल्या जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कसोटी सामन्यात पाकिस्तानने संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. मोहम्मद रिझवानच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज सर्फराज अहमदचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2017 मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभूत करून पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा सरफराज अहमद तब्बल 4 वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे.

टी-20 आणि वनडे फॉरमॅटमधील पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला मोहम्मद रिझवान कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडू शकलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. रिझवानचा फॉर्म पाहता माजी कर्णधार सर्फराज अहमदला कसोटी संघात स्थान देण्याची मागणी केली जात होती.

मोहम्मद रिझवानची गेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या 46 आहे, परंतु बाबर आझम आणि संघ व्यवस्थापन त्याला वारंवार संधी देत ​​होते. सर्फराज अहमदचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. आता पीसीबीमध्ये नजम सेठी आणि शाहिद आफ्रिदी आल्यानंतर सरफराजला तब्बल 4 वर्षांनंतर कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

कर्णधार बाबर आझमला रिजवानऐवजी संघात दुसरा यष्टीरक्षक फलंदाज पाहायचा नाही, असा आरोप होत होता. इंग्लंडविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करताना रिझवानने 29 आणि 46 धावा केल्या. बाबरने त्याला मुलतानमध्ये सलामीची संधी दिली पण तो अपयशी ठरला. या कसोटीत तो केवळ 10 आणि 30 धावा करू शकला. कराचीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यातही रिझवान आपल्या फॉर्मशी झुंजताना दिसला आणि 19 आणि 7 धावा करून बाद झाला. रिजवानने कराचीमध्ये 9 महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev App: महादेव बेटिंग अ‍ॅपचे पुणे कनेक्शन, व्यापाऱ्यासह 70 जणांना अटक

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Lok Sabha Election: INDIA आघाडीला किती जागा मिळणार? काँग्रेस नेत्याने पहिल्यांदाच केला एवढा मोठा दावा

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

SCROLL FOR NEXT