Mohammad Rizwan Religious Speech esakal
क्रीडा

Mohammad Rizwan | VIDEO : रिझवानचे न्यूझीलंडच्या मशिदीतील धार्मिक भाषण होतयं व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Rizwan Religious Speech : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्रायसिरीज खेळण्यासाठी गेला आहे. या मालिकेत न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात टी 20 मालिका होत आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पाणी पाजल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा देखील पराभव केला. दरम्यान पाकिस्तानचा विकेटकिपर मोहम्मद रिझवानचा न्यूझीलंडमधील मशिदीमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनलवरून 3 मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मोहम्मद रिझवान माईकवरून धार्मिक भाषण देताना दिसतोयय तो मशिदीत मोठ्या जनसमुदायाला संबोधित करत होता. तो अल्लाहला ओळखण्याची शिकवण उपस्थित लोकांना देत होता. पाकिस्तानचा क्रिकेट संघ हा जास्त धार्मिक संघ मानला जातो. खेळाडू कायम मैदानावर नमाज पठण करताना दिसतात.

टी 20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. आशिया कपमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. इंग्लंड विरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील त्याने धावांचा रतीब लावला होता. आता न्यूझीलंड दौऱ्यावर देखील तो चांगली फलंदाजी करतोय. रिझवानने गेल्या 10 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये 6 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

2019 मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदीमध्ये माथेफिरू हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यावेळी बांगलादेशचा संघ न्यूझीलंडचा दौरा करत होते. काही खेळाडू देखील मशिदीत उपस्थित होते. अल नूर मशिद आणि ख्राईस्टचर्च उपनगर लिनवूड येथील मशिदीमध्ये हा हल्ला झाला होता. यात 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. अल नूर मशिदीवर झालेल्या हल्ल्यावेळी बांगलादेशचे खेळाडू मशिदीत उपस्थित होते. मात्र ते सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मोदी सरकारला धक्का! निवडणूक आयुक्तांबाबतच्या कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाची नोटीस, मागितलं उत्तर

Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभवला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ मोठे विक्रम मोडण्याची संधी; विराट, शिखर, शुभमन यांचे विक्रम तुटणे निश्चित

Labor Law Changes: Layoff झाला तरी खात्यात पैसे येणार? ‘पुनर्कौशल्य निधी’मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Kolhapur Election : ‘लाडकी बहीण’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसला बहिणीच धडा शिकवतील; खासदार धनंजय महाडिकांचा थेट हल्लाबोल

Mohol Politics: स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपचे दोन डझन इच्छुक; उपनगराध्यपदाची लॉटरी कोणाला लागणार? मोहोळकरांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT