Mohammad Shami T-20 world cup 2022  
क्रीडा

Mohammed Shami: शमीचे World Cup खेळण्याचे स्वप्न भंगले? कधी होणार तंदुरुस्त

जवळपास वर्षभरानंतर टी-20 संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीसाठी आजचा दिवस खूपच वाईट होता.

Kiran Mahanavar

Mohammed Shami T-20 world cup 2022 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो या मालिकेतून पूर्णपणे बाहेर गेला आहे. जवळपास वर्षभरानंतर टी-20 संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीसाठी हे वृत्त खूपच वाईट होते. टीम इंडियाचे खेळाडू मोहालीला पोहोचले आहे.

मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी 17 सप्टेंबरला समोर आली, त्यामुळे तो आता संपूर्ण वेळ वैद्यकीय देखरेखीखाली राहणार आहे. 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरू होत असून ती 25 सप्टेंबरला संपणार आहे. अशा परिस्थितीत तो या मालिकेत खेळणार नाही. शमी जर वेळेवर बरा झाला तर तो 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेचा भाग होऊ शकतो. भारताला 28 सप्टेंबर, 2 आणि 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिकाही होणार आहे.

मोहम्मद शमीने 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारताकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता. एक वर्षानंतर त्याची संघात निवड झाली होती. तसेच 2022 च्या T20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. गरज पडल्यास त्याचा मुख्य संघातही समावेश केला जाऊ शकतो. विश्वचषक सुरू होण्यास अजून एक महिना बाकी आहे, त्यामुळे मोहम्मद शमी तोपर्यंत कोरोनामधून सहज बरा होऊ शकतो.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

Pune Crime : टिपू पठाण टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली; लाखोंचा मुद्देमाल जप्त, बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू

SCROLL FOR NEXT