Ind Vs Nz Semi Final World Cup 2023 Mohammed Shami
Ind Vs Nz Semi Final World Cup 2023 Mohammed Shami Esakal
क्रीडा

Mohammed Shami: तीन वेळा केला होता जीव संपवण्याचा प्रयत्न... वडिलांचं क्रिकेटच स्वप्न पूर्ण करणाऱ्या शमीची कहाणी

Kiran Mahanavar

Ind Vs Nz Semi Final World Cup 2023 Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 मध्ये धुमाकूळ घालत आहे. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने किवी संघाचा 70 धावांनी पराभव केला. टीम इंडिया आता 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये केवळ 17 सामन्यात 50 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले. यावर मोहम्मद शमी म्हणाला की, प्लेइंग-11 संघात संधी मिळण्याची वाट पाहत आहे. मी जास्त पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळलो नाही. पण न्यूझीलंडविरुद्ध (धर्मशाला) माझे पुनरागमन सुरू झाले. आम्ही विविधतेबद्दल खूप बोलतो आहे, पण माझा विश्वास आहे की चेंडू पुढे खेळणे आणि नवीन चेंडूने विकेट घेणे महत्वाचे आहे.

शमी पुढे म्हणाला की, ही खूप चांगली भावना आहे. गेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये आम्ही उपांत्य फेरीत हरलो. अशी संधी पुन्हा कधी मिळणार हे कोणालाच माहीत नाही, त्यामुळे यावेळी आम्हाला कोणतीही कसर सोडायची नव्हती. ही संधी आम्हाला हातातून जाऊ द्यायची नव्हती.

वडिलांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या शमीची कहाणी

वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीच्या कारकिर्दीची सुरुवात सोपी राहिलेली नाही. शमीला हा टप्पा गाठण्यात त्याचे वडील तौसिफ अली यांची मोठी भूमिका आहे. तौसिफ अली यांना वेगवान गोलंदाजीची आवड आणि कौशल्य होते.

मात्र, त्यांची ही प्रतिभा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये दबून राहिली. त्यानंतर तौसिफ यांनी आपल्या मुलामध्ये म्हणजेच मोहम्मद शमीमध्ये आपल्या प्रतिभेची चमक पाहिली. आणि त्याला मुरादाबादमधील क्रिकेट प्रशिक्षकाकडे घेऊन गेले. त्याचे वेगवान चेंडू पाहून शमीचे प्रशिक्षकही चकित झाले.

शमीचा जन्म उत्तर प्रदेशात असूनही त्याच्या राज्याच्या अंडर-19 संघात त्याची निवड होऊ शकली नाही. यानंतर प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार तो कोलकाताला गेला आणि तिथे डलहौसी क्रिकेट क्लबकडून खेळू लागला. यावेळी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी सहाय्यक सचिव देवव्रत त्याच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. यानंतर त्याने शमीला मोहन बागान क्लबमध्ये पाठवले. तेथे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याला गोलंदाजी करताना पाहिले आणि त्यानंतर शमीने बंगालच्या रणजी संघात स्थान मिळवले.

03 सप्टेंबर 1990 रोजी अमरोहा, उत्तर प्रदेश येथे जन्मलेल्या मोहम्मद शमीने 06 जानेवारी 2013 रोजी दिल्लीतील अरुण जेटल स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 100 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामने खेळले आहेत. आणि 194 विकेट घेतले आहेत. त्याचप्रमाणे त्याने 64 कसोटी सामन्यात 229 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर शमीने 23 मॅचमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत.

पत्नीशी वाद आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप

मोहम्मद शमीने 2014 मध्ये मॉडेल आणि चीअरलीडर हसीन जहाँशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे. सध्या दोघेही वेगळे राहतात. खरंतर 2018 मध्ये शमी आणि हसीन जहाँ यांच्यात कौटुंबिक वाद समोर आला होता.

हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरगुती हिंसाचार आरोप करत केस दाखल केली होती. ज्यामध्ये शमीच्या मोठ्या भावावरही बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. हसीनने शमीवर घरगुती हिंसाचार, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकीसह अनेक आरोप केले होते.

मात्र, शमीने सर्व आरोप फेटाळून लावत त्याचे क्रिकेटपासून लक्ष विचलित करण्याचा कट असल्याचे म्हटले होते. 2 सप्टेंबर 2019 रोजी कोलकाता न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

9 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने वॉरंटला स्थगिती दिली होती. सध्या हसीन जहाँ आणि शमीचा घटस्फोटाचा खटला कोर्टात प्रलंबित आहे. हसीनच्या म्हणण्यानुसार, शमी तिला दरमहा 1.30 लाख रुपये देखभाल भत्ता म्हणून देतो.

मॅच फिक्सिंगचे आरोप

हसीन जहाँनेही शमी मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा केला होता. या आरोपांनंतर बीसीसीआयने शमीला आपल्या राष्ट्रीय करार यादीतून काढून टाकले होते. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटने या आरोपांची चौकशी केली आणि शमीला भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त करण्यात आले. तसेच बीसीसीआयने त्याचा राष्ट्रीय करार बहाल केला.

आत्महत्येचा केला होता विचार

शमीच्या वडिलांचे 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वडिलांच्या संघर्षाबद्दल आणि पाठिंब्याबद्दलही तो अनेकदा बोलले आहेत. त्यानंतर 2020 मध्ये शमीवर त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. शमी म्हणाला होता की, त्याने तीन वेळा आत्महत्येचा विचार केला होता, पण त्याच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात वाद आणि दुखापतींमुळे शमीला क्रिकेटमध्ये परतण्यासाठी संघर्ष करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT