Mohammed Shami  esakal
क्रीडा

महिलांच्या मागे लागणाऱ्यांमूळे...हसीन जहॉंने Mohammed Shami ला पुन्हा डिवचले

धनश्री ओतारी

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ सातत्याने वादग्रस्त विधान करत असते. शमी संदर्भात नेहमी वादग्रस्त पोस्ट शेअर करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करते. दोघांचाही वाद सोशल मीडियावर चर्चेत असतो. दरम्यान, भारताच्या विजयानंतर हसीनाने संघाचे कौतुक करत शमीवर शेरेबाजी केली आहे.(Mohammad Shami estranged wife Hasin Jahan mocks veteran bowler on social media after India beat Pakistan in Asia Cup)

मागील रविवारी आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचे अभिनंदन करणारी इंस्टाग्राम पोस्ट हसीन जहॉंने केली होती. या पोस्टमध्ये अष्टपैलू खेळाडू पांड्यासह संघातील खेळाडूंचे कौतुक केले. पण शमीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

हसीनाने काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

“अभिनंदन. महान विजय… देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आपल्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार, देशभक्तांपासून वाचते, गुन्हेगार आणि महिलांच्या मागे लागणाऱ्यांमूळे नाही.” अशी सोशल पोस्ट हसीनाने केली आहे.

हसीन जहॉं आणि मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. २०१८ मध्ये दोघांमध्ये वाद झालेला. हसीन जहाँने शमी आपल्याला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. शमी आणि हसीन यांनी २०१४ मध्ये लग्न झाले होते. २०१८ मधील वादानंतर तिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. हसीन सातत्याने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, रिल्स व्हिडिओ पोस्ट करत असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT