Mohammed Shami Hair Transplant  esakal
क्रीडा

Mohammed Shami : हुआ छोकरा जवां रे.... पंतचं ते ट्विट लागलं जिव्हारी, शमीचा कायापालट झाला

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami Hair Transplant : भारतीय संघ आशिया कप 2023 खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होणार आहे. आशिया कपमध्ये ब्रेकवर गेलेला मोहम्मद शमी पुनरागमन करणार आहे. संघात दाखल झालेल्या मोहम्मद शमीचा नवा लूक पाहून सर्वजण अवाक झाले आहेत.

आशिया कपपूर्वी मोहम्मद शमीचा कायापालट झाला आहे. मोहम्मद शमीला वेस्ट इंडीज आणि आयर्लंड दौऱ्यावर ब्रेक देण्यात आला होता. त्याचा त्याने चांगला उपयोग करत हेअर ट्रान्सप्लान्ट करून घेतलं आहे. शमीच्या हेअर ट्रान्सप्लांटमांग ऋषभ पंतचे ते ट्विट असल्याचं बोललं जात आहे.

मोहम्मद शमीने हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचा नवा लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचबरोबर ऋषभ पंतने 2021 मध्ये केलेले ट्विट देखील व्हायरल होत आहे.

ऋषभ पंतने 2021 मध्ये मोहम्मद शमीला वाढदिवसांच्या शुभेच्छा देताना एक खोचक वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, 'भाई डोक्यावरची केसं आणि वय वेगाने निघून चाललं आहे. हॅप्पी बर्थडे मोहम्मद शमी.'

मोहम्मद शमीने देखील पंतला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. तो म्हणाला होता, 'बेटा आपली वेळ येईल. केसं आणि वय यांना कोणीही रोखू शकत नाही. मात्र स्थूलपणावर आतही उपचार होतात.'

पंत आणि शमीचा हा ट्विटरवरील चेष्टेचा विषय शमीने मात्र मनावर घेतला अशी चर्चा आहे. याच कारणाने त्याने हेअर ट्रान्सप्लाट करून घेतल्याचे बोलले जाते.

मोहम्मद शमी हा भारतीय संघातील सध्याचा एक मुख्य गोलंदाज आहे. आशिया कप यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटचा वनडे सामना या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता.

मोहम्मद शमी भारताकडून कसोटी आणि टी 20 मालिका खेळत होता. वनडेमध्ये शमीची कामगिरी पाहिली तर त्याने 90 वनडे सामने खेळले असून त्यात 162 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Shravan Month 2025 Fasting Benefits: श्रावणातील उपवासामुळे मिळते शरीराला नैसर्गिक डिटॉक्स, जाणून घ्या फायदे

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

SCROLL FOR NEXT