Mohammed Shami esakal
क्रीडा

Mohammed Shami : शामीचा ऐतिहासिक पंजा! 48 वर्षात जे घडलं नाही ते करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami IND vs NZ : भारतासाठी वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा पेपर हा कायम अवघड असतो. आजच्या सामन्यात देखील रचिन रविंद्र (75) आणि डॅरेल मिचेल (130) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचल्यानंतर रोहितचे टेन्शन वाढले होते. त्यात भारत आज फक्त पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरला होता.

मात्र यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहम्मद शामीने रचिनला 75 धावांवर बाद करत ही जोडी फोडली अन् भारताने किवींना 273 धावात रोखले. शामी फक्त जोडी फोडून थांबला नाही तर त्याने सामन्यात 54 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

अशी कामगिरी त्याने वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा केली आहे. भारताकडून 48 वर्षात वनडे वर्ल्डकपमध्ये दोनवेळा 5 विकेट्स घेणारा शामी हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

वर्ल्डकप 2023 मध्ये आज भारतीय संघ न्यूझीलंडसोबत भिडत आहे. न्यूझीलंड हा आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी कायम आव्हानात्मक संघ राहिला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या रोहितला मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामीने दोन विकेट्स घेत चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडचा फक्त डाव सावरला नाही तर त्यांना मजबूत स्थितीत देखील पोहचवले.

अखेर मोहम्मद शामीने 75 धावा करणाऱ्या रचिन रविंद्रला बाद करत ही जोडी फोडली. रचिनने 87 चेंडूत 75 धावा केल्या. त्यानंतर टॉम लॅथम 5 धावा करून बाद झाला. त्याला कुलदीपने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

मात्र यानंतर डॅरेल मिचेलने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ग्लेन फिलिप्ससोबत पाचव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी कुलदीप यादवने फोडली. त्याने फिलिप्सला 23 धावांवर बाद केले.

यानंतर कॅम्पमन 6 तर सँटनर 1 धावेची भर घालून परतला. कॅम्पमनला बुमराहने तर शमीने सँटनरला बाद केले. शामीने पुढच्याच चेंडूवर मॅट हेन्रीचा देखील शुन्यावर त्रिफळा उडवत किंवींना आठवा धक्का दिला.

त्यानंतर 50 वे षटक टाकणाऱ्या शामीला मिचेलने एक षटकार आणि एक चौकार मारत दबाव निर्माण केला होता. मात्र शामीने त्याला पाचव्या चेंडूवर 130 धावांवर बाद करत आपला पंजा पूर्ण केला. शेवटच्या चेंडूवर लोकी फर्ग्युसन चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT