Mohammed Shami esakal
क्रीडा

T20 World Cup 2022 : टीम इंडियात शमीला न घेण्याचे हे आहे खरे कारण

टी-20 वर्ल्ड कपसाठी मोहम्मद शमीचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 Mohammed Shami Team India : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेल्या बहुतांश खेळाडूंचा या संघात समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमीला मात्र यावेळीस निवड समितीने संघात संधी दिली नाही. शमी हा टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज असून त्याने अनेक प्रसंगी अप्रतिम कामगिरी केली आहे. पण तो नोव्हेंबर 2021 पासून टी-20 फॉरमॅटमधून संघाबाहेर आहेत. शमीचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. म्हणजे एखादा गोलंदाज जखमी झाल्यास शमीला मुख्य संघात स्थान मिळेल.

इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला फिरकी गोलंदाजी हवे होते. ज्यामुळे शमीला T20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. निवड समितीने टी-20 विश्वचषकासाठी 4 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. भुवनेश्वर कुमारची अलीकडील कामगिरी पाहता, त्याचे नाव आधीच निश्चित झाले होते. अर्शदीप सिंगला त्याच्या डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या गोलंदाजीमुळे अनुभव नसतानाही संघात संधी मिळाली. 

रोहित शर्मा आणि प्रशिक्षक द्रविड यांचा असा विश्वास आहे की, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. यावेळी गरमी असून कोरड्या खेळपट्टीमुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. निवड बैठकीच्या जवळच्या सूत्रांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, बैठकीत शमी आणि आर अश्विनच्या नावावरून वाद झाला कारण द्रविड आणि रोहित दोघेही अश्विनच्या बाजूने होते. अशा स्थितीत निवडकर्त्यांनाही त्याची आज्ञा पाळावी लागली. अश्विन ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT